NCP SP MPs PM Modi Meeting Pudhari
राष्ट्रीय

NCP SP MPs PM Modi Meeting: नवीन राजकीय घडोमोडी... आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही नरेंद्र मोदींना भेटणार?

Anirudha Sankpal

NCP Sharad Pawar MPs PM Modi Meeting: नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यात नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात उडी मारलेल्या खासदारांचा देखील समावेश होता. यावेळी या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाबरू नका मी तुमच्या पाठीशी असल्याचं सांगितलं होतं. आता राष्ट्रवादी शरद पवार गाटाचे खासदार देखील पंतप्रधान मोदींच्या भेटीला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. या सर्व खासदारांकडून पंतप्रधानांना भेटण्याची वेळ मागण्यात आली आहे. ही भेट पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. एका खासदाराने ही फक्त सदिच्छा भेट असणार आहे असं सांगितलं. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यानं राज्यात नवीन राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार हे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची शक्यता आहे. ही भेट जरी सदिच्छा भेट आणि विकासकामांसंदर्भातील भेट असं म्हणत असले तरी केंद्र सरकार डिलीमिटेशन बीलची जोरदार तयारी करत असून त्यासाठी खासदारांची जुळवाजुळव सुरू आहे.

तसेच शिवसेना पक्ष चिन्हाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागण्याची शक्यता आहे. हा निकाल सर्वांसाठी लागू असेल असे सर्वोच्च न्यायालयाने आधीच स्पष्ट केलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील भाजप ही दोन्ही एनसीपींचे विलिनीकरण होण्यासाठी आग्रही आहे. त्या दृष्टीकोणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांच्या खासदारांनी भेट घेणे राजकीय घडामोडींच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT