national herald case
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात नवीन FIR दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांच्यावर फौजदारी कटाच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हा नवीन FIR दाखल केला आहे. या FIR मध्ये राहुल आणि सोनिया यांच्यासह अन्य सहा लोक आणि तीन कंपन्यांनाही आरोपी बनवण्यात आले आहे.
काय आहे आरोप?
FIR नुसार, काँग्रेसशी संबंधित कंपनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडला फसवणुकीने ताब्यात घेण्यासाठी 'क्रिमिनल कॉन्स्पिरसी' अर्थात फौजदारी कट रचण्यात आला, असा आरोप आहे. हा FIR 3 ऑक्टोबर रोजी ईडीच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. ईडीने आपल्या तपास अहवालाची माहिती दिल्ली पोलिसांना दिली होती.
एजेएलच्या अंदाजे २००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर यंग इंडियन नावाच्या कंपनीद्वारे नियंत्रण मिळवल्याचा आरोप आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त, एफआयआरमध्ये सॅम पित्रोदा (इंडियन ओव्हरसीज काँग्रेस प्रमुख), इतर तीन व्यक्ती आणि तीन कंपन्यांची नावे आहेत.