राजस्‍थानच्या वाळवंटातील रहस्‍यमय गाव  canva Image
राष्ट्रीय

Mysterious Village in Rajasthan |राजस्‍थानच्या वाळवंटातील रहस्‍यमय गाव : २०० वर्षांपासून पडले आहे ओस

जैसलमेरजवळ असलेल्‍या या गावात दडली आहेत अनेक रहस्‍य : रात्री थांबण्यास आहे मनाई

Namdev Gharal

A mysterious village in the desert of Rajasthan: It has been deserted for 200 years

नवी दिल्‍ली : राजस्‍थानमधील वाळवंटात वसलेले एक गाव आहे. जेथील रहस्‍यामुळे अनेकांना बुचकळ्यात पाडले आहे. कारण गेली २०० वर्षे हे गाव ओसाड पडले आहे. या गावाविषयी अनेक आख्यायिका आहेत. या गावाचे नाव आहे ‘कुलधरा’. राजस्‍थानच्या थार वाळवंटातील जैसलमेर जिल्ह्यात हे वसलेले आहे. या गावाला ‘भुतांचे गाव’ म्हणूनही ओळखले जाते.

रातोरात गावकरी गेले गाव सोडून

एकेकाळी हे गाव इतर गावांसारखेच कुलधरा समृध्द होते. पालीवाल ब्राह्मणांचे येथे वास्‍तव्य होते पण अचानक रातोरात हे गाव रिकामे झाले. एका रात्रीत तेथील रहिवाशी हे गाव सोडून गेले किंवा गायब झाले अशी एक कथा प्रचलित आहे. या विषयी स्‍थानिकांमध्ये अनेक कथा प्रचलित आहेत. आज हे गाव पर्यटकांसाठी एक रहस्यमय आणि आकर्षक ठिकाण बनले आहे.17 व्या शतकात पालीवाल ब्राह्मणांनी स्थापन केलेले हे गाव समृद्धी आणि सुसंस्कृत समाजासाठी प्रसिद्ध होते. गावातील घरांची रचना आणि पाणी व्यवस्थापनाची प्रगत पद्धत त्यावेळच्या प्रगत समाजाची साक्ष देते. मात्र, 19 व्या शतकाच्या सुरुवातीला, सुमारे 1825 मध्ये, गावातील सर्व रहिवासी अचानक गायब झाले. त्यांच्या गायब होण्यामागील कारण आजही रहस्य आहे. यावेळी गावात ५००० हजार लोक वास्‍तव्यास होते असे पुरावे आहेत.

स्थानिक लोककथांनुसार, गावातील पालीवाल ब्राह्मणांना स्थानिक सत्ताधाऱ्याकडून, विशेषतः याठिकाणी असलेला दिवाण सालमसिंग यांच्याकडून त्रास सहन करावा लागला. त्‍याला एका ब्राह्मण मुलीसोबत लग्‍न करायचे होते. त्‍यामुळे त्‍याने गावकऱ्यांना त्रास देण्यास सुरवात केली. तर काहींच्या मते, कराच्या जाचाला कंटाळून लोकांनी गाव सोडले. पण गाव सोडताना या ब्राह्मण गावकऱ्यांनी गावाला श्राप दिला की यापुढे कोणीही येथे वास्तव्य करू शकणार नाही. त्यामुळे आजही हे गाव वीरान आहे, असे मानले जाते.

पुरातत्‍व विभागाच्या ताब्‍यात

आज कुलधरा भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे आणि पर्यटकांसाठी खुले आहे. गावातील जुन्या वास्तू, मंदिरे आणि पाण्याच्या विहिरींचे अवशेष पर्यटकांना भूतकाळात घेऊन जातात. रात्रीच्या वेळी येथे थांबण्यास मनाई आहे, कारण काहींना येथे असाधारण अनुभव आल्याचा दावा आहे. पर्यटकांना थरारक अनुभवासाठी येथे भेट देण्याचा सल्ला दिला जातो, परंतु सूर्यास्तापूर्वी परतण्याची सूचना आहे.आधुनिक प्रयत्न: 1974 मध्ये जैसलमेरचे तत्कालीन जिल्हा प्रमुख भोपाल सिंह भाटी यांनी या वीरान गावात सिंधी समुदायाला वसवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गावातील रहस्यमय वातावरणामुळे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. सध्या हे गाव पर्यटन आणि ऐतिहासिक संशोधनासाठी महत्त्वाचे ठिकाण मानले जाते.निष्कर्ष:

काय येथे आहे भुतांचे वास्‍तव्य ?

कुलधरा हे गाव आजही इतिहास, रहस्य आणि अंधश्रद्धेच्या कथांनी परिपूर्ण आहे. हे गाव पर्यटकांसाठी एक अनोखा अनुभव आहे. मात्र, येथे रात्रीच्या वेळी अनेकांना विचित्र अनुभव येत असतात. त्‍यामुळे या गावाला ‘भूतांचे गाव’ असे नाव पडले आहे. पण अनेक संशोधकांना हे मान्य नाही. पण स्‍थानिक लोकांच्या मते याठिकाणी रात्र झाली की येथे आपोआप भिती वाटू लागते. त्‍यामुळे प्रशासनसुद्धा याठिकाणी रात्री कोणाला थांबू देत नाही. येथे अशा कोणत्‍याही अतार्किक गोष्‍टींचा पुरावा सापडलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT