पुढारी ऑनलाईन डेस्क: दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्यासाठी येत्या ३ दिवसांत अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यताृ आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची अधिक शक्यता वर्तवली आहे. शुक्रवार ३१ मे रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन (Monsoon 2024 Update) होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख १ जून आहे; परंतु यंदा एक दिवस आधीच मान्सून मुख्य भूभागावर प्रवास सुरू करणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे. पुढील तीन दिवसात म्हणजे १९ मे पर्यंत मान्सून द. अंदमानचा समुद्र, आग्नेय बंगालचा समुद्र, आग्नेय बंगालचा उपसागर आणि निकोबार बेटांवर दाखल होऊ शकतो, त्यामुळे सर्वसाधरण तारखेच्या आधी म्हणजे ३१ मे ला मान्सूनचे केरळमध्ये आगमन (Monsoon 2024 Update) होऊ शकते, असे देखील आयएमडीने दिलेल्या बुलेटीनमध्ये स्पष्ट केले आहे.
मान्सून साधारणपणे १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो; त्यानंतर त्याचा उत्तरेच्या दिशेने प्रवास सुरु होतो. १५ जुलै पर्यंत तो संपूर्ण देश व्यापतो. यंदा देशात मान्सून दमदार बरसणार असल्याचा अंदाज आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांत देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने याआधीच वर्तवली आहे.
हेही वाचा: