Momo Addiction file photo
राष्ट्रीय

Momo Addiction: धक्कादायक! १४ वर्षांच्या मुलाला लागलं मोमो खाण्याचं व्यसन; पैसे नसल्यामुळे घरात जे केलं ते पाहून हादराल!

व्यसन कोणत्याही गोष्टीचे असो, ते विनाशाला कारणीभूत ठरते, याचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात आला आहे.

मोहन कारंडे

Momo Addiction

उत्तर प्रदेश: व्यसन कोणत्याही गोष्टीचे असो, ते विनाशाला कारणीभूत ठरते, याचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात आला आहे. मोमो खाण्याच्या व्यसनाने एका १४ वर्षीय मुलाने चक्क आपल्याच घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे दागिने त्याने एका मोमो विक्रेत्याला देऊन त्याबदल्यात मोमो फस्त केले.

काय आहे नेमके प्रकरण?

रामपूर परिसरातील एका गावात राहणारा हा अल्पवयीन मुलगा 'स्ट्रीट फूड'चा प्रचंड शौकीन होता. त्याला मोमो खाण्याचे इतके व्यसन जडले होते की, खिशात पैसे नसतानाही त्याने आपली ही भूक भागवण्यासाठी घरच्या दागिन्यांवर डल्ला मारण्यास सुरुवात केली. तो घरातील सोन्याचे दागिने गुपचूप चोरून रामपूर शहरातील एका मोमो विक्रेत्याकडे द्यायचा आणि त्या बदल्यात मोमो खायचा.

चोरी उघडकीस कशी आली?

हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता, मात्र कुटुंबाला याचा पत्ताही लागला नाही. नुकतीच मुलाची काकू तिचे दागिने नेण्यासाठी आपल्या माहेरी आली होती. जेव्हा तिने कपाट उघडले, तेव्हा तिला सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच गोंधळ उडाला. घरच्यांनी जेव्हा मुलाकडे कडक चौकशी केली, तेव्हा त्याने सत्य कबूल केले. आपण दागिन्यांच्या बदल्यात मोमो विक्रेत्याकडून खाद्यपदार्थ घेतल्याचे त्याने सांगितले, जे ऐकून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. कुटुंबीयांनी याप्रकरणी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार नोंदवून घेण्यात आली असून तपास सुरू आहे.

"आम्ही प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत. तो मोमो विक्रेता कोण आहे, याचा शोध घेतला जात असून लवकरच त्याला ताब्यात घेण्यात येईल. चोरीला गेलेल्या दागिन्यांच्या एकूण किमतीचाही अंदाज घेतला जात आहे," अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT