PM Modi France Visit  (Source- @narendramodi)
राष्ट्रीय

Modi Macron Mumbai Meeting: मोदी–मॅक्रॉन मुंबईत समोरासमोर; संरक्षण व तंत्रज्ञान सहकार्यावर निर्णायक चर्चा

‘इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन वर्ष 2026’चा शुभारंभ; द्विपक्षीय संबंधांना नवी चालना

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर येणार असून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत.

मॅक्रॉन 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये मंगळवारी दुपारी 3.15 वाजता मुंबईत लोक भवन येथे चर्चा होणार आहे. या बैठकीत संरक्षण, अवकाश, अणुऊर्जा, व्यापार, गुंतवणूक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. जागतिक घडामोडींवरही दोन्ही नेते विचारांची देवाणघेवाण करतील.

मंगळवारी संध्याकाळी 5.15 वाजता पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या हस्ते ‌‘इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन वर्ष 2026‌’चा शुभारंभ होईल. या कार्यक्रमाला दोन्ही देशांतील उद्योगपती, स्टार्टअप्स, संशोधक आणि नवोन्मेष क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित असतील.

मॅक्रॉन यांचा चौथा भारत दौरा

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा हा चौथा भारत दौरा असून मुंबईतील पहिलाच दौरा आहे. एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत सहभागासह ही द्विपक्षीय बैठक भारत-फ्रान्स संबंधांना नवी चालना देणारी ठरणार असल्याचे मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT