नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सीमेवरील राज्यांमध्ये शनिवारी मॉक ड्रिल पार पडले. ऑपरेशन शील्ड अंतर्गत जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातसह पाकिस्तानच्या सीमेवरील सर्व पश्चिमेकडील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे मॉक ड्रिल करण्यात आले.
मॉक ड्रिल दरम्यान, लोकांना युद्धादरम्यान कसे टिकून राहायचे हे शिकवले गेले. विविध ठिकाणी रात्री ८ वाजता १५ मिनिटांसाठी ब्लॅकआउट करण्यात आले होते. रुग्णालये, अग्निशमन केंद्रे आणि पोलिस स्टेशन यासारख्या अत्यावश्यक आपत्कालीन सेवा वगळता महत्त्वाच्या क्षेत्रांजवळ हे नियंत्रित ब्लॅकआउट केले गेले. हल्ल्याच्या दरम्यान वाजतात तसे सायरन वाजवले गेले.
भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्रसंधी असूनही दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर काही आठवड्यांनंतरच दुसरे नागरी संरक्षण मॉक ड्रिल पार पडले.