Operation Sindoor ANI photo
राष्ट्रीय

Operation Sindoor | पंजाब सीमेवर तणाव! अमृतसरमध्ये क्षेपणास्त्राचे तुकडे सापडले; लष्कराने परिसर घेतला ताब्यात

पंजाबच्या सीमेवर क्षेपणास्त्राचे अवशेष सापडले आहेत. लष्कराने तातडीने परिसर सील केला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मोहन कारंडे

Operation Sindoor |

अमृतसर : पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमृतसरमध्ये बुधवारी मध्यरात्री स्फोटांचे आवाज आले. आज सकाळी शहराच्या बाहेरील जेठुवाल, माखन विंडी आणि पंढेर येथील शेतात क्षेपणास्त्रांचे अवशेष सापडले. यानंतर भारतीय लष्काराच्या जवानांनी हा परिसर ताब्यात घेतला आहे.

अमृतसरमध्ये तीन ठिकाणी स्फोटांचे आवाज

बुधवारी रात्री उशिरा १:४५ वाजता अमृतसरमध्ये तीन ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले. यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करत संपूर्ण जिल्ह्यात ब्लॅकआउट लागू केले. लोकांनी अजिबात घाबरू नये असे अधिकाऱ्यांकडून सतत आवाहन केले जात होते. दुसरीकडे, श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल पूर्णपणे रिकामे करण्यात आले आणि तेथेही ब्लॅकआउट लागू करण्यात आले.

पाक क्षेपणास्त्राचे भाग?

जेठुवाल, माखन विंडी आणि पंढेर येथील शेतात क्षेपणास्त्रांचे अवशेष सापडले आहेत. स्फोटानंतर क्षेपणास्त्राचा एक भाग जेठुवाल येथील शेतात पडलेला आढळला. घरांवरही कचरा पडलेला दिसून आला. गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. सीमावर्ती भागात ज्या ठिकाणी क्षेपणास्त्राचे तुकडे आढळले आहेत, त्या भागाला लष्कराच्या जवानांनी वेढा घातला आहे. एसएचओ जंडियाला हरचंद सिंग संधू यांनी सांगितले की, माहिती मिळताच लष्कराचे जवान घटनास्थळी पोहोचले. शेतात एक जिवंत स्फोटक सापडला आहे. पाकिस्तानकडून आलेल्या क्षेपणास्त्राचा तो भाग आहे की नाही हे सांगता येत नाही. गावकऱ्यांना दूर हलवण्यात येत असून परिसरात सैन्य तैनात असल्याचे त्यांनी सांगितले.

Operation Sindoor अजुनही सुरूच!

भारताने Operation Sindoor राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यात १०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली. दरम्यान, या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT