गांधी जयंतीदिनी राजघाटावर मेधा पाटकरांचे उपोषण Pudhari Photo
राष्ट्रीय

गांधी जयंतीदिनी राजघाटावर मेधा पाटकरांचे उपोषण

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी जयंतीदिनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर राजघाटवर उपोषण करणार आहेत. लडाखचा राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी करणारे कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ हे उपोषण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षणतज्ज्ञ आणि हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह दिल्ली सीमेवर सुमारे १५० जणांना पोलिसांनी अटक केले. त्यानंतर काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी वांगचुक यांच्या अटकेचा तीव्र निषेध केला आहे. त्याचबरोबर, नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंट (एनएपीएम) देखील वांगचुक यांच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. मेधा पाटकर यांनी सोनम वांगचूक यांच्या अटकेबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, वांगचूक यांची अटक म्हणजे कटकारस्थान आहे. शेतकरी आंदोलनात जशी शेतकऱ्यांना वागणूक दिली. अगदी तशीच वागणूक सरकार वांगचूक आणि सहकाऱ्यांना देत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला.

महात्मा गांधी यांच्या जयंतिदिनी बुधवार, २ ऑक्टोबर रोजी राजघाट येथे सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत उपोषण करणार असल्याचे पाटकर यांनी जाहीर केले. पाटकरांनी आपल्या समर्थकांना उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की, आजचा कोणताही केंद्रशासित प्रदेश प्रत्यक्षात स्थानिक लोकांद्वारे शासित नाही. जनतेच्या मान्यतेशिवाय निर्णय लादले जात आहेत. लडाखमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक आदिवासी लोकसंख्या आहे. ईशान्येकडील राज्यांप्रमाणे सहावी अनुसूची हवी आहे. जेणेकरून तिथल्या लोकांचाही उदरनिर्वाह सुरळीत करण्याची काही भूमिका आहे. सोनम आणि त्यांच्या समर्थकांची सुटका करण्याची मागणी पाटकर यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT