चित्रपट निर्मात्या डॉक्टर स्वप्ना पाटकर यांना पोलिसांकडून अटक

Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एका खासदारावर छळ करीत असल्याचा आरोप करणाऱ्या चित्रपट निर्मात्या डॉक्टर स्वप्ना पाटकर यांना मंगळवारी वांद्रे पोलिसांनी अटक केली. डॉक्टरेट पदवी बनावट असल्याचा आरोप पाटकर यांच्यावर आहे. पाटकर यांना आज, बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयात पीएचडी केलेली नसतानाही स्वप्ना पाटकर यांनी कानपूरच्या छत्रपती शाहूजी महाराज विश्व विद्यालयात या विषयामध्ये पीएच.डी केल्याचे बनावट प्रमाणपत्र बनविल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तक्रारदार गुरदीप कौर सिंग यांनी हा आरोप केला आहे. २००९ मध्ये मिळविलेल्या या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे पाटकर यांनी लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये ऑनररी कन्सल्टन्ट म्हणून नियुक्ती मिळविल्याचेही गुरदीप यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे. 

गुरदीप यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास केला असता पाटकर यांची पदवी बोगस असल्याचा अहवाल विश्व विद्यालयाकडून देण्यात आला. त्यानंतर पाटकर यांच्या विरोधात भादंवि कलम 419, 420, 467, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील बायोपिक "बाळकडू"ची निर्मिती केली होती. मराठीतील एका आघाडीच्या दैनिकात त्या काही काळ स्तंभलेखनही करीत होत्या. अलीकडेच  पत्रकार, खासदार संजय राऊत यांच्यावर छळाचा आरोपही त्यांनी केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news