Burqa Issue Shocking Crime News: शामली येथील एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. घरातील वाद इतका टोकाला गेला की एका व्यक्तीनं आपली पत्नी अन् दोन मुलींची निर्घृण हत्या केली. तो इथंपर्यंतच थांबला नाही तर त्यानं मृतदेहासोबतही धक्कादायक कृत्य केलं. हत्या करणारा व्यक्ती पत्नी अन् मुलींनी बुरखा घालत नाही यावरून देखील नाराज होता. सध्या पोलिसांनी फारूख याला ताब्यात घेतलं आहे. मृतदेहांचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ डिसेंबरपासून फारूखची पत्नी अन् दोन मुली बेपत्ता होत्या. नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी याबाबत पोलिसात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तापास सुरू केल्यावर त्यांचा पहिला संशय हा फारूख याच्यावरच गेला.
प्रकरण गंभीर असल्यानं शामलीचे एसपी एन. पी. सिंह यांनी मोठ्या फैजफाट्यासह गाव गाठलं. एसपी यांनी सांगितलं की चौकशीदरम्यान पती फारूखने पत्नी अन् दोन मुलींची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर तीनही मृतदेह हे घरात खोदून ठेवलेल्या मैल खड्ड्यात गाढून टाकले. हत्येपूर्वी फारूकने पत्नीला मारहाण केल्याचा देखील संशय वक्त केला जात आहे.
पोलिसांनी आरोपी फारूखला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली. फारूकने कुटुंबियांना पत्नी आणि मुलींना माहेरी सोडून आल्याचे सांगितले होते. दरम्यान, पोलिसांना तपास करत असताना अजून तीन मृतदेह सापडलेले नाहीत. मात्र या घटनेमुळं गावत हादरून गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुजफ्फरनगरच्या ताहिरा आणि काधलाचा फारूख यांचा निकाह १८ वर्षापूर्वी झाला होता. त्यांना पाच मुले आहेत. आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे. कौटुंबिक कलहामुळे एका महिन्यापूर्वी ताहिरा मुलांना सोडून माहेरी गेल्या होत्या. ताहिरा बुरखा घालत नसल्यावरून देखील फारूख नाराज होता. १५ दिवसांपूर्वी फारूखने पत्नी ताहिराला परत आणलं होतं. मात्र पुन्हा वाद झाला.
पत्नीने तिच्या मर्जीने जगायचं असल्याचं सांगितल्यावर सनकी पती फारूखने ताहिरा अन् दोन मुलींची निर्घृण हत्या करण्याचा कट रचला.