Mahindra XUV 7XO file photo
राष्ट्रीय

Mahindra XUV 7XO: महिंद्राने लाँच केली हाय-टेक XUV 7XO; किंमत आणि अलेक्सा, ChatGPT सह भन्नाट फीचर्स एकदा पाहाच!

महिंद्राने अखेर आपली अपडेटेड XUV700 आता XUV 7XO या नवीन नावाने भारतात लाँच केली आहे.

मोहन कारंडे

Mahindra XUV 7XO

मुंबई: महिंद्राने अखेर आपली अपडेटेड XUV700 आता XUV 7XO या नवीन नावाने भारतात लाँच केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या गाडीची मोठी उत्सुकता होती. ही गाडी म्हणजे सध्याच्या XUV700 चे अपडेटेड (फेसिलिफ्ट) व्हर्जन असून, आकर्षक लूक आणि हाय-टेक फीचर्ससह ती आता ग्राहकांच्या भेटीला आली आहे. भारतीय बाजारपेठेत तिची स्पर्धा एमजी हेक्टर आणि टाटा सफारी यांसारख्या गाड्यांशी असेल.

किंमत किती?

नवीन XUV 7XO ची सुरुवातीची किंमत १३.६६ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. तर यातील सर्वात महागड्या 'AX7L' डिझेल मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत २२.४७ लाख रुपये आहे. ही विशेष किंमत पहिल्या ४०,००० ग्राहकांसाठी लागू असेल.

कधी मिळणार डिलिव्हरी?

टेस्ट ड्राईव्ह: ८ जानेवारीपासून सुरू.

बुकिंग: अधिकृत बुकिंगला लवकरच सुरुवात होईल.

डिलिव्हरी: टॉप मॉडेलची डिलिव्हरी १४ जानेवारीपासून, तर बेस मॉडेलची डिलिव्हरी एप्रिल २०२५ पासून सुरू होईल.

दमदार इंजिन

महिंद्राने या गाडीत इंजिनमध्ये बदल केलेला नाही. यात पूर्वीप्रमाणेच दोन पर्याय मिळतात: १. पेट्रोल इंजिन: २.० लिटर टर्बो-पेट्रोल (२०० hp पॉवर). २. डिझेल इंजिन: २.२ लिटर टर्बो-डिझेल (१८५ hp पॉवर).

बाहेरून लूक कसा आहे?

गाडीचा समोरचा भाग आता अधिक स्टायलिश झाला आहे. यात नवीन डिझाइनचे LED हेडलाईट्स आणि ग्रिल देण्यात आली आहे. मागील बाजूस LED लाईट पट्टी आणि नवीन प्रकारचे अलॉय व्हील्स यामुळे गाडीला स्पोर्टी लूक मिळाला आहे.

काय आहेत हाय-टेक फीचर्स?

नवीन XUV 7XO मध्ये तंत्रज्ञान, लक्झरी आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

मोठा डिस्प्ले: गाडीत १०.२५ इंचाचे तीन मोठे HD स्क्रीन्स आहेत.

भारतात पहिल्यांदाच अलेक्सा सोबत आता ChatGPT ची जोड देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्ही गाडीशी गप्पा मारू शकता आणि माहिती विचारू शकता.

आरामदायी प्रवास: स्काय-रूफ, व्हेंटिलेटेड सीट्स आणि उत्तम म्युझिक सिस्टम.

सुरक्षा: सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्ज, ५४०-डिग्री कॅमेरा (गाडीच्या चहूबाजूंनी पाहण्यासाठी) आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटर असे प्रगत फीचर्स दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT