Misal Pav Pudhari
राष्ट्रीय

TasteAtlas Top 50 Breakfasts | महाराष्ट्राच्या मिसळचा जगात झणझणीत सन्मान; 'टॉप 50 ब्रेकफास्ट'च्या यादीत 'या' स्थानावर एंट्री

TasteAtlas Top 50 Breakfasts | भारतातील तीन पदार्थांचा TasteAtlas च्या यादीत समावेश; भारतीय स्ट्रीट फूडला जागतिक मान्यता

Akshay Nirmale

TasteAtlas Top 50 Breakfasts Misal Pav global ranking chole bhature paratha uthappa dosa global acclaim

नवी दिल्ली : एकीकडे जगभरात ब्रेकफास्टसाठी क्रॉसाँ किंवा अ‍ॅव्होकाडो टोस्टसारखे परदेशी पदार्थांना प्राधान्य दिले जात असतानाच भारतीय पारंपरिक आणि चविष्ट न्याहारींनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळू लागली आहे.

सुप्रसिद्ध फूड गाईड TasteAtlas ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘जगातील 50 सर्वोत्तम ब्रेकफास्ट’ (50 Best Breakfasts in the World) यादीत भारताच्या तीन पारंपरिक पदार्थांनी स्थान मिळवले आहे. मिसळ, छोले भटुरे आणि पराठा हे ते तीन पदार्थ होत. विशेष म्हणजे या यादीत महाराष्ट्राच्या झणझणीत मिसळने थेट टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे.

मिसळने मिळवला जागतिक सन्मान

महाराष्ट्राचा पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ मिसळ या यादीत नवव्या (9व्या) क्रमांकावर आहे. अंकुरित मटकीपासून बनलेली, तिखट रस्सा आणि फरसाणसह सर्व्ह केली जाणारी मिसळ, कांदा, लिंबू आणि पावासोबत खाल्ली जाते.

मिसळ ही केवळ चविष्ट नव्हे, तर विविध टेक्स्चर असलेला एक ‘फ्लेवरचा स्फोट’ आहे. तोंडाला झणझणीत लागणारी, पण पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी ही चव म्हणूनच महाराष्ट्रभर प्रचंड लोकप्रिय आहे.

इन्स्टाग्रामवर आणि स्ट्रीट फूड कार्यक्रमांमुळे मिसळची लोकप्रियता आणखी वाढली आहे. महाराष्ट्रातली अनेक खवय्ये मिसळला ‘ब्रेकफास्ट ऑफ चॅम्पियन्स’ मानतात.

दिल्लीचा अभिमान - छोले भटुरे

या यादीत 15 व्या क्रमांकावर आहे उत्तर भारतातील अस्सल आणि खास पदार्थ – छोले भटुरे. फुलपंखी तळलेले भटुरे आणि झणझणीत, मसालेदार छोले हा दिल्लीतल्या लोकांचा ‘ओरिजिनल ब्रेकफास्ट’ मानला जातो. ओल्ड दिल्लीच्या गल्लीपासून ते पंजाबी घराघरांत, छोले भटुरे अनेक पिढ्यांपासून ब्रेकफास्टचा बादशहा ठरला आहे.

पराठा – देशाच्या हृदयातला स्वाद

या यादीत 25 व्या क्रमांकावर आलेला पदार्थ म्हणजे पराठा. अगदी कोणत्याही प्रकारच्या सारणासह बनवले जाणारे पराठे भारताच्या प्रत्येक भागात वेगळ्या पद्धतीने खाल्ले जातात. दही, लोणी, लोणचं किंवा अगदी चहा सोबतही त्याची जोडी जुळते.

याशिवाय या यादीत भारतातातील छोले भटुरे, उत्थप्पा, डोसा, पराठा, आलू पराठा, मसाला डोसा या पदार्थांचाही समावेश आहे.

भारतीय खाद्यसंस्कृतीसाठी मोठी गोष्ट

TasteAtlas ची ही यादी प्रेक्षकांच्या मतांवर आणि अन्न तज्ज्ञांच्या परीक्षणावर आधारित असते. यादीत पारंपरिक युरोपीय किंवा पूर्व आशियाई पदार्थांचा वरचष्मा असतो, त्यामुळे भारताच्या स्ट्रीट फूड ब्रेकफास्टने यात स्थान मिळवणं ही मोठी गोष्ट आहे.

असे आहेत टॉप 10 ब्रेकफास्ट

  1. Komplet Lepinja (सर्बिया)

  2. Roti Canai (मलेशिया)

  3. पाओ डी क्वीजो (ब्राझील)

  4. Bougatsa (ग्रीस)

  5. Chilaquiles (मेक्सिको)

  6. Nan-e Barbari (इराण)

  7. क्रोसाँ (फ्रान्स)

  8. Jianbing (चीन)

  9. मिसळ पाव (भारत - महाराष्ट्र)

  10. कटमर (तुर्की)

काय आहे TasteAtlas ?

TasteAtlas ही एक ऑनलाईन फूड आणि ट्रॅव्हल गाईड करणारी वेबसाईट आहे. जी जगभरातील पारंपरिक खाद्यपदार्थ, त्यातील स्थानिक घटक (ingredients), पदार्थांची रेसिपी, पदार्थाचा उगम आणि सांस्कृतिक महत्त्व, पारंपरिक रेस्टॉरंट्स यांची माहिती देते.

TasteAtlas दरवर्षी विविध प्रकारची यादी प्रकाशित करते जसे की: जगातील सर्वोत्तम पदार्थ, सर्वोत्तम देशीय खाद्यसंस्कृती (cuisine), सर्वाधिक लोकप्रिय पनीर, भात, ब्रेड, सूप्स इत्यादी.

TasteAtlas चा वापर प्रवासी, फूडीज आणि शेफ्स, संस्कृती अभ्यासक, खाद्य अभ्यासक करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT