mohan yadav Land Scam pudhari
राष्ट्रीय

Land Scam: सरकारी प्रकल्पांच्या ठिकाणी भाजप मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांकडून जमीन खरेदीचा सपाटा... मोठी माहिती आली समोर

Anirudha Sankpal

mohan yadav family buying land : मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांबात एक मोठी माहिती समोर आली असून जिथं सरकारी प्रकल्पांची आखणी सुरू आहेत त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांकडून जमीन खरेदीचा सपाटा लावण्यात आला आहे. मोहन यावद यादव यांच्या कुटुंबियांनी आणि निकटवर्तीयांनी उज्जैनमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली आहे असा आरोप होत आहे.

NAचा प्रस्ताव अन् भूखंड खरेदी

उज्जैन शहरच्या विकासाचा आराखड्यात ज्या क्षेत्रांना कृषी ऐवजी निवासी म्हणून प्रस्तावित केलं आहे. त्या प्रत्येक क्षेत्रात मुख्यमंध्यांच्या कुटुंबियांनी जमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे.

१३ डिसेंबर २०२३ मध्ये मोहन यादव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर २०२५ पर्यंत त्यांच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्याशी संबंधित बांधकाम कंपन्यांनी उज्जैनमध्ये ४५ कोटी रूपयांना १६८ एकर क्षेत्रफळाचे १३७ भूखंड खरेदी केले आहेत.

जमीन खरेदीत कोणाचा समावेश?

या जमीन खरेदीमध्ये मुख्यमंत्री मोहन यांच्या पत्नी सीमा, सून शालिनी, भाऊ नंदलाल आणि नारायण, वहिनी रेखा आणि पुतण्या अभय यांच्यासह अनेक नातेवाईकांचा देखील समावेश आहे.

मुख्यमंत्री होण्यापूर्वी मोहन यादव यांचा मुलगा वैभव आणि मुलगी कलावती यांच्या मालकीचे १६७ एकरचे १०८ भूखंड उज्जैन परिसरात होते. त्यात २०२१ ते २०२३ दरम्यान ८५ एकरची अजून भर पडली आहे.

सरकारी प्रकल्पांचा फायदा

मध्य प्रदेश सरकारने २०२३ ते २०२५ या काळात उज्जैन शहरात्या पायाभूत विकासासाठी नवीन रस्ते, जोड रस्ते आणि महामार्गांची आखणी केली. याच प्रकल्पालगत यादव कुटुंबियांनी जमीन खरेदी केल्याचे आता उघड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT