Leh Ladakh Donation Drive for Iran pudhari
राष्ट्रीय

Iran US War India Help: इराणला पाठिंबा देण्यासाठी लेहमधील तरूणाने एक अंडे तब्बल २५ हजारांना केलं खरेदी... Video व्हायरल

Anirudha Sankpal

Leh Ladakh Donation Drive for Iran: लडाखमधील लेह जिल्ह्यात इराणमधील पीडितांना मदत करण्यासाठी देणगी गोळा करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी एका युवकाने इराणला भक्कम पाठिंबा दर्शवला. लेहमधील स्थानिक शब्बीर हुसैन याने लिलावात एका अंड्यासाठी तब्बल २५ हजार रुपये मोजले.

या अंड्याची बाजारातील किंमत ही फक्त १० रूपये होती. याद्वारे त्याने इराणला भक्कम पाठिंबा देतोय असा संदेश दिला. त्याने अंडे लिलावातील ही रक्कम इराणमधील पीडितांना विशेष करून मुलांसाठी खर्च केली जाणार आहे असं सांगितलं. हा देणगी कार्यक्रम स्थानिक प्रशासनानं आयोजित केला होता. यात लेहमधील अंजुमन इमामिया आणि मजलिस ए उलेमा यांचा समावेश होता.

१० रूपयाचे अंडे २५ हजाराला का घेतले?

दरम्यान, एका अंड्यासाठी तब्बल २५ हजार रूपये बोली लावणाऱ्या शब्बीरने एएनआयला मुलाखत दिली. यात त्याने एका छोट्या अंड्यासाठी एवढे पैसे का मोजले याचे स्पष्टीकरण दिलं.

शब्बीर म्हणतो, 'सर्वांना माहिती आहे की या एका अंड्याची किंमत ही १० रूपये आहे. मी यासाठी २५ हजार रूपये माझ्याकडे आहेत म्हणून खर्च केले नाहीत तर हा आमच्याकडून इराणमधील पीडित मुलांना एक संदेश आहे. आम्ही तुमच्यासाठी २५ हजार रूपये देखील खर्च करू शकतो. आम्ही आमचं आयुष्य तुम्हाला देण्यासाठी तयार आहोत. आम्ही त्या कम्युनिटीसाठी जिवंत आहोत. आमचे लीडर आम्हाला जे काही सांगतील ते आम्ही फॉलो करणार आहोत. सध्याच्या घडीला तरी आमच्या नेत्यांनी आम्हाला कोणता आदेश दिलेला नाही.'

भारतातील शिया कम्युनिटीचा मदतीचा हात

शिया मुस्लीम कम्युनिटी ही लडाख आणि जम्मू काश्मीरमधील काही भागात पसरलेली आहे. त्यांनी इराणसाठी मानवी सहाय्यता देण्यासाठी अनेक वस्तू दिल्या आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून लोकं इराणसाठी फक्त पैशाची नाही तर सोनं चांदी, जीवनावश्यक वस्तू आणि पारंपरिक तांब्याच्या वस्तू देखील देणगी म्हणून देत आहेत.

अनेक महिलांनी त्यांचे वैयक्तिक सोन्याचे दागिने, घरातील मौल्यवान वस्तू देणगी म्हणून दिल्या आहेत. यात मुलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. त्यांनी देखील आपले सेव्हिंग आणि ईदला मिळालेले पैसे देणगी म्हणून दिले आहेत.

इराणच्या समर्थनार्थ मोहीम

याच प्रकारची इराणच्या समर्थनार्थ देणगी मोहीम चंदेरकोट, रामबन इथले शिया कम्युनिटीतील लोकं इमामबारा इथं आपलं योगदान देण्यासाठी जमले होते. लोक त्यांना जमेल तसं आणि जमेल त्या पद्धतीनं देणगी देत आहेत. बडगाममध्ये स्थानिकांनी देणगी गोळा करण्यासाठी स्टॉल उभारले आहेत.

भारतातील इराणच्या दूतावासाने एक्स पोस्ट करून भारतातील जनतेनं दिलेल्या मदतीची दखल घेतली असून त्यांनी या प्रेमळ माणुसकीसाठी आभार देखील मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT