Crime News pudhari photo
राष्ट्रीय

Crime News: अल्पवयीन नवरा नवरी, पाच वर्षापासून महिलेवर करत होता प्रेम; १८ वर्षांच्या मोहसिनच्या क्रूर कृत्याने गाव हादरला

पोलिसांनी आरोपीला त्याच्या घरातून अटक केली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात 'अल्पवयीन' हा मुद्दा प्रकाशझोतात आला आहे.

Anirudha Sankpal

Crime News Illicit Affair Murder: कुच जिल्ह्यातील भूज तालुक्यात एक निघृण खुनाची घटना समोर आली आहे. १८ वर्षाच्या एका पुरूषानं आपल्या पत्नीचा खून करून तिचा मृतदेह विहीरीत टाकला. त्यानं हे कृत्य आपल्या विवाहबाह्य सबंधामुळ केलं. तो दुसऱ्या एका महिलेवर प्रेम करत होता. दरम्यान पोलिसांनी आरोपीला त्याच्या घरातून अटक केली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात अल्पवयीन हा मुद्दा प्रकाशझोतात आला आहे.

अनैतिक संबंधांमुळं केला खून

पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या FIR नुसार कुलसूम आणि मोहसीन यांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. विशेष म्हणजे कुलसूम ही अजूनही अल्पवयीनच आहे. तर मोहसिन हा १८ वर्षाचा झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की मोहसिन हा अजून एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. ही महिला त्याच्याच गावतील होती.

हे रिलेशनशिप जवळपास ५ वर्षापासून सुरू होतं. म्हणजे मोहसिनच्या लग्नाआधीपासूनचं हे प्रकरण आहे. यावरून कुलसूम आणि मोहसिन यांच्यात सतत वाद देखील होत होते. चौकशीदरम्यान मोहसिननं त्याच्या अनैतिक संबंधांमध्ये कुलसूम ही अडथळा ठरत होती असं सांगितलं आहे.

पोलिसांनी सांगितले की, मोहसिने शुक्रवारी रात्री कुलसूमचा धारदार शस्त्राने गळा कापला. त्यानंतर तिचा मृतदेह हा सॅकमध्ये भरून तो मोटरसायकलवरून ज्या शेतात तो काम करतो त्या शेतात नेला. तिथं त्यानं हा मृतदेह विहीरीत टाकून दिला.

घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार

मोहसिननं केलेला हा सगळा प्रकार ज्यावेळी शनिवारी सकाळी कुलसूम ही तिच्या सासरच्या घरातून बेपत्ता झाली असल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी केल्यावर उघडकीस आला. कुलसूमचे माहेर हे अवघ्या २०० मीटर अंतरावर आहे. त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली.

विहीरीत कपडे तरंगत होते...

या शोधमोहिमेवेळी कुलसूमचे कपडे शेतातील विहीरीत तरंगताना दिसले. त्यानंतर तिचा मृतदेह विहीरीतून बाहेर काढण्यात आला. तपास अधिकारी ए.के. जडेजा यांनी सांगितले की, हे जोडपं भाऊ बहीण आहेत. कुलसूम ही मोहसीन यांच्या काकांची मुलगी आहे. तपासादरम्यान, असं आढळून आलं की मोहसिनने लग्नानंतरही दुसऱ्या महिलेसोबतचे आपले अनैतिक संबंध तसेच सुरू ठेवले होते. याच्यातून हा खून झाला आहे.

अजून कोणी सामील आहे का?

पोलिसांनी मोहसिनकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे. त्याचबरोबर त्याच्याकडून मोटरसायकल देखील ताब्यात घेतली आहे. याच मोटरसायकलवरून मोहसीननं कुलसूमचा मृतदेह शेतात नेला होता. दरम्यान, पोलीस या गुन्ह्यात अजून कोणी व्यक्ती सामील होती का याचा देखील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT