Marathi Language Viral Video:
एअर इंडियाच्या कोलकाता ते मुंबई विमानात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून शाब्दिक वादावादी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ २३ ऑक्टोबरचा असून माही खान यांनी या वादाचा व्हिडिओ शेअऱ केला आहे. या व्हिडिओत माही खान यांच्यासोबत प्रवास करणारी महिला खान यांना मराठी बोलता येत नाही यावरून सुनावताना दिसत आहे.
खान यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये महिला सहप्रवासी जर तुम्ही मुंबईत जात आहात तर तुम्हाला मराठी यायला पाहिजे असं म्हणताना दिसत आहे.
खान यांनी सांगितलं की ज्यावेळी त्यांनी मराठीतून बोलण्यास नकार दिला त्यावेळी त्या महिलेनं मला धमकावण्याचा प्रयत्न केला. खान म्हणाले की, 'तुम्ही मला सांगताय की तुम्हाला माराठी बोलता यायला पाहिजे. त्यावर महिला सहप्रवासी म्हणते की होय तुम्ही मुंबईला चालला आहे त्यामुळं तुम्हाला मराठी बोलता यायला पाहिजे.' त्या महिलेनं ऑन कॅमेरा तिचं नाव सांगण्यास नकार दिला.
खान यांनी सांगितलं की महिलेच्या चुकीच्या वागणुकीबद्दल त्यांनी तिच्याशी वाद घातला आणि त्यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना बोलवलं. त्यावेळी त्या महिलेनं मी तुम्हाला वाईट वागणूक काय असते हे दाखवतेच अशी धमकी देखील दिल्याचा दावा खान यांनी केला.
खान यांनी या व्हिडिओत असा देखील दावा केला आहे की संबंधित महिला ही 16A आसन क्रमांकावर बसली होती. ती मला मी मुंबईला चाललो आहे म्हटल्यावर मराठी बोलता यायला पाहिजे असं ओरडत होती. त्यावर मी हा काय अगाऊपणा आहे असं शांततेत म्हणालो त्यावेळी त्यांनी मी तुम्हाला आगाऊपणा काय असतो हे दाखवतेच असं प्रत्युत्तर दिलं.
दरम्यान, खान यांनी २०२५ मध्ये देखील आपण विशिष्ठ भाषा बोलण्याची सक्ती करतोय ही कसली मानसिकता आहे असा देखील प्रश्न विचारला. व्हिडिओत पुढे म्हणतात. मी सर्व काही रेकॉर्ड केलं आहे. हे फक्त माझ्या बाबतीतलं नाहीये. हा मानसिकतेचा विषय आहे. ही मानसिकता दिवसेंदिवस वाढत आहे आणि याचं नॉर्मलाजेशन होत आहे.'
खान यांनी एअर इंडियानं या महिलेविरूद्ध काहीतरी कडक कारवाई केली पाहिजे असं म्हणत आपला व्हिडिओ संपवला.