मिथून चक्रवर्ती कोलकता येथे आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. Pudhari Photo
राष्ट्रीय

Kolkata Rape And Murder : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण निषेधार्ष 'मिथुन'दा रस्त्यावर

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगाल येथील कोलकातामध्ये शासकीय रुग्णालयातील (आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय) प्रशिक्षणार्थी डॉक्टर (पीजी, द्वितीय वर्ष) युवतीवर बलात्कारानंतर तिची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी संपुर्ण देशामध्ये तीव्र निदर्शने सुरु आहेत. याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील डॉक्टरांना ड्युटीवर परत जाण्यासाठी फटकारले आहे. तसेच बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते मिथून चक्रवर्ती हे सुद्धा पिडीत तरुणीला न्याय मिळावा यासाठी निदर्शनांमध्ये सहभागी झाले आहेत. याची माहिती पीटीआयने एका व्हिडीओद्वारे दिली आहे.

न्याय मिळेपर्यत थांबणार नाही : मिथून चक्रवर्ती

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकऱणात सहभागी झाल्यानंतर अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी पीटीआयसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले "बंगाल हे अन्यायाविरुद्ध लढणारे राज्य आहे. आतापर्यंत आमचा आवाज दाबला गेला आहे. आता लोक कोणालाही घाबरत नाहीत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT