PM Modi gifts to G7 leaders  Pudhari
राष्ट्रीय

PM Modi G7 gifts | कोल्हापुरी चांदीचा हंडा... पितळी बोधी वृक्ष... G7 परिषदेच्या मंचावर पंतप्रधान मोदींनी दिलेल्या गिफ्ट्सची चर्चा

PM Modi G7 gifts | भारतीय संस्कृतीतील गिफ्ट्समुळे जागतिक नेते झाले मंत्रमुग्ध; परिषदेच्या मंचावर ‘इन्क्रेडिबल इंडिया’ची झलक

Akshay Nirmale

PM Modi G7 gifts world leaders Indian handicrafts Traditional Indian art gifts

नवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडामधील G7 शिखर परिषदेत सहभागी होताना विविध देशांच्या नेत्यांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या खास भेटवस्तू दिल्या. भारताच्या विविध राज्यांतील पारंपरिक हस्तकला, कारागिरी आणि लोककलेचे दर्शन घडवणाऱ्या या भेटवस्तूंनी जागतिक व्यासपीठावर भारतीय संस्कृतीचे आकर्षक चित्र उभे केले. कोणत्या देशाच्या प्रमुखाला पंतप्रधानांनी काय गिफ्ट दिले ते जाणून घेऊया...

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी पितळी बोधीवृक्षाची मूर्ती

मोदींनी कार्नी यांना पितळी बोधीवृक्षाची मूर्ती (बिहार) भेट दिली. ही मूर्ती (Brass Bodhi Tree) त्या वृक्षाचे प्रतीक आहे, जिथे गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. बुद्धत्व, शांती आणि आध्यात्मिक जागृती यांचे प्रतीक असलेली ही मूर्ती अत्यंत कलाकुसरपूर्ण आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांना डोक्रा नंदी शिल्प

तामिळनाडू येथील पुरातन 'लॉस्ट-वॅक्स' तंत्राने बनवलेले हे नंदी शिल्प आहे. जाळीदार रचना आणि लाल सजावट असलेले हे शिल्प पारंपरिक धातुकलेचा उत्तम नमुना आहे.

मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबाम पार्डो यांना वारली चित्रकृती

महाराष्ट्रातील आदिवासी वारली जमातीची ही कला, साध्या भाताच्या पेस्टने मातीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण जीवन, शेती, नृत्य यासारख्या दृश्यांनी सजलेली असते. एकतेचे आणि संस्कृतीचे प्रतीक मानली जाणारी वारली चित्रकला (Warli painting) सांस्कृतिक बंध निर्माण करणारी आहे.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांना मधुबनी चित्र

नैसर्गिक रंगांचा वापर आणि कथानकात्मक शैलीने सजलेली ही बिहारची चित्रकला (Madhubani) निसर्ग, देवी-देवतांचे चित्रण आणि लोककथांवर आधारित असते. महिलांनी विकसित केलेली ही पारंपरिक कला आता जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.

दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांना डोक्रा घोडा

छत्तीसगड येथे पुरातन तंत्राने बनवलेला हा पितळी घोडा, निष्ठा, ताकद आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो. विविध जडाव काम, घंट्या आणि साखळ्या याने हा घोडा सजलेला आहे.

ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांना बोट

सिल्वा यांना मेघालयातील बांबूपासून बनवलेली हंसासहाची बोट भेट दिली आहे. पूर्वोत्तर भारतातील मेघालयमधून साकारलेली ही पारंपरिक व पर्यावरणस्नेही हस्तकला, तिथल्या नैसर्गिक सौंदर्याचे आणि कारागिरीचे दर्शन घडवते.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना कोल्हापुरी चांदीचा हंडा

अल्बानीज यांना कोल्हापुरी चांदीचा हंडा (Kolhapuri silver pot) भेट दिला आहे. शुद्ध चांदीपासून बनवलेला हा हांडा, कोरीव फुलांचे व पिसांच्या नक्षीने सजवलेला असून, कोल्हापुरी पारंपरिक समारंभिक संस्कृतीचे प्रतीक आहे.

जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज कोणार्क चक्राची प्रतिकृती

ओडिशातील 13व्या शतकातील सूर्य मंदिरातील कोणार्क चक्राची ही रेतीच्या दगडातील प्रतिकृती 'काल' आणि 'सृष्टी' यांचे प्रतीक आहे. बारकाईने कोरलेली ही कलाकृती ओडिशाच्या वास्तुकलेचा गौरव आहे.

कॅनडाच्या गव्हर्नर जनरल मेरी सायमन यांना चांदीची पर्स

ओडिशातील 'तरकासी' नावाच्या 500 वर्ष जुन्या हस्तकलेचा नमुना असलेली ही पर्स, कटकमधील सुप्रसिद्ध चांदीचे बारिक तंतू वापरून बनवलेला नाजूक कलाकृतीचा नमुना आहे.

अल्बर्टाच्या प्रीमियर डॅनिएल स्मिथ यांना बॉक्स आणि चांदीची नक्षी

राजस्थानातील आबनूस लाकडातील जाळी कामाचा बॉक्स व चांदीची नक्षी भेट दिली आहे. हाताने कोरलेली ही पेटी, रेखीव जाळी नक्षी आणि वरती चित्रित मोरासह, राजस्थानातील पारंपरिक हस्तकलेचे दर्शन घडवते.

अल्बर्टाच्या लेफ्टनंट गव्हर्नर सलमा लाखानी यांना पेटी

काश्मीरची पापिए माशे पेटी लाखानी यांना भेट दिली आहे. हाताने रंगवलेली आणि सोन्याच्या पत्र्याने सजलेली ही पेटी, काश्मीरच्या पारंपरिक कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यावर फुलांची व निसर्गचित्रे दाखवली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT