Khan Sir Surrender pudhari
राष्ट्रीय

Khan Sir Surrender: खान सर अखेर आले शरण... FIR दाखल झाल्यावर न्यायालयात पोहचले

Anirudha Sankpal

Khan Sir Surrender Coaching Class Firing: पटना येथील आपल्या कोचिंग क्लास खान ग्लोबल स्टडीजमध्ये झालेल्या तोडफोड आणि कथित फायरिंग प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर खान सर शरण आले आहेत. त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करत आत्मसमर्पण करण्यासाठी पटनाच्या दिवाणी न्यायालयात पोहचले आहेत.

FIR झाली दाखल

सध्यातरी फैजल खान यांना कोणी कोर्टात पोहचताना पाहिलेलं नाही कारण कोर्ट परिसरात माध्यमांना जाण्यास मनाई आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिविल कोर्टात अनुराग वर्मा हे खान सरांना अंतरिम जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल करू शकतात. खान सरांच्या कोचिंगमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर पटना पोलीसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केली होती.

काय आहे प्रकरण?

गेल्या मंगळवारी २ जून रोजी रात्री १५ ते २० लोकांच्या एका अज्ञात समुहाने पटनामधील खान सरांच्या कोचिंग क्लास खान ग्लोबल स्टडीज इंस्टिट्यूटवर हल्ला केला होता. हल्लेखोरांनी क्लासमध्ये जबरदस्त तोडफोड केली होती. तसेच दगडफेक देखील झाली. यानंतर सोशल मीडियावर एका व्हिडिओ व्हायरल झाला त्यात कोचिंग क्लासच्या दोन गार्ड्सनी हवेत गोळीबार केल्याचं दिसून येत होतं. या प्रकरणी पोलिसांनी गुरूवारी दोन्ही गार्ड्सना ताब्यात घेतलं होतं.

पटनाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी तोडफोड प्रकरणी फैसल खान यांचे देखील नाव एफआयआरमध्ये असल्याचा खुलासा केला होता. त्यांनी खान सरांची पोलीस लवकरच चौकशी करतील असं सांगितलं होतं. त्यांनी खान सरांवर कोणती कलमे लावली आहेत हे मात्र सांगितलं नाही.

या घटनेनंतर पटनामधील कोचिंग सेंटरमधील स्पर्धा अजून तीव्र झाली आहे. खान सरांनी सुरूवातीला क्लासमधील तोडफोड आणि गोळीबार हा प्रतिस्पर्धी कोचिंग क्लासच्या लोकांनी केल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिस्पर्धी कोचिंग क्लासने प्रेस कॉन्फरन्स घेऊन खान सरांनी प्रसिद्धीसाठी किंवा इतर कराणांसाठी ही घटना घडवून आणली असल्याचा दावा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT