राष्ट्रीय

Arvind Kejriwal | केजरीवालांचा अंतरिम जामीन संपणार, तिहार प्रशासनासमोर आज आत्मसमर्पण करणार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी 21 मे रोजी अटक करण्यात आलेले केजरीवाल निवडणूक प्रचारासाठी 1 जूनपर्यंत अंतरिम जामिनावर बाहेर होते. दरम्यान आज (दि.०२ जून) त्यांचा जामीन संपल्यानंतर ते तुरुंगात आत्मसर्पण (Arvind Kejriwal) करणार आहेत, या संदर्भातील माहिती माध्यमांनी दिली आहे.

केजरीवाल यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये 21 दिवसांसाठी जामीन मंजूर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. तसेच आज ३ वाजता घरातून बाहेर पडून राजघाटावर महात्मा गांधी आणि दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात दर्शन घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पक्ष कार्यालयात जाऊन सर्व कार्यकर्त्यांची आणि पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार आहे. तेथून मी पुन्हा तिहार तुरुंगात जाणार असल्याचे म्हटले आहे.

'वैद्यकीय' जामिनासाठीच्या याचिकेवर ५ जून रोजी निर्णय

गेल्या आठवड्यात, आप प्रमुखांनी वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन सात दिवसांच्या वाढीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. केजरीवाल यांनी दावा केला की त्यांना चाचण्यांसाठी वेळ लागेल कारण त्यांचे वजन कमी होत आहे आणि उच्च केटोन पातळी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने त्याच्या याचिकेची त्वरित यादी करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी अंतरिम जामीनासाठी विशेष सीबीआय-ईडी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ५ जूनपर्यंत निकाल राखून ठेवला आहे.

हे ही वाचा:

SCROLL FOR NEXT