राष्ट्रीय

Arvind Kejriwal |आत्मसमर्पण मुदतीपूर्वीच केजरीवालांचा जामिनासाठी अर्ज, आज दुपारी सुनावणी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आत्मसमर्पणाच्या मुदतीच्या अवघ्या ३ दिवस आधी राऊस एव्हेन्यू कोर्टात जामीन याचिका दाखल (Arvind Kejriwal) केली आहे. सत्र न्यायालय आज दुपारी २ वाजता आम आदमी पार्टी संयोजकांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीनामध्ये ७ दिवसांची  मुदतवाढ मिळण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. आरोग्याच्या काही तपासण्या करण्यासाठी केजरीवलांनी (Arvind Kejriwal) जामीन वाढवून मागितला होता. परंतु जामिनाची मुदत वाढवण्याच्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता केजरीवालांनी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. केजरीवालांच्या या याचिकेवर आज (दि.३० मे) दुपारी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

केजरीवालांना जामीनाला मुदतवाढ कशासाठी?

  • वैद्यकीय चाचण्यांसाठी सात दिवसांची मुदतवाढ हवी
  • वजन कमी झाले असून केटोन पातळी अत्यंत वाढली आहे.
  • 'पीएटी-सीटी स्कॅन'सह काही वैद्यकीय चाचण्यां करणे आवश्यक

1 जूनपर्यंत अंतरिम जामीन, २ जूनला आत्मसमर्पण करण्याचे आदेश

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली. या अटकेविरोधात केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र उच्च न्यायालयाने त्‍यांची याचिका फेटाळली. यानंतर त्‍यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT