Tumakuru cab bomb blast file photo
राष्ट्रीय

Crime News: विवाहाला नकार, नंबर ब्लॉक, प्रेयसीचं अपहरण अन् चाकूने हल्ला; नंतर कारमध्येच बॉम्बस्फोट... ब्रेकअपची हादरवणारी कहाणी

प्रेयसीने विवाहाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीचे कॅबमधून अपहरण केले. पोलिस मागावर असल्याचे समजताच तिच्यावर चाकूने वार केले.

पुढारी वृत्तसेवा

Tumakuru cab bomb blast

तुमकुरू (कर्नाटक): प्रेयसीने विवाहाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीचे कॅबमधून अपहरण केले. पोलिस मागावर असल्याचे समजताच तिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर गावठी बॉम्बच्या साहाय्याने कॅब उडवून देत स्वतःचे जीवन संपवण्याची धक्कादायक घटना कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यात घडली.

नागेंद्र आणि बंगळूर येथे ऑपरेशन थिएटर असिस्टंट म्हणून काम करणारी रम्या (नाव बदलले आहे) यांच्यात गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. नागेंद्र लग्नासाठी दबाव टाकत होता; मात्र तिने नकार दिला होता आणि त्याचा नंबर ब्लॉक केला होता. शनिवारी नागेंद्र रम्या राहते त्या ठिकाणी पोहोचला. त्याने चाकूचा धाक दाखवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि जबरदस्तीने अंकोला येथे जाण्यासाठी कॅब बूक केली. रम्याच्या रूममेटने तातडीने सिद्धपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने कारचा माग काढला आणि कॅब ड्रायव्हर प्रवीणशी संपर्क साधून त्याला जवळच्या पोलिस ठाण्यात गाडी थांबवण्यास सांगितले. चालक आणि पोलिसांचे फोनवरील संभाषण नागेंद्रने ऐकले. आपले अपहरण उघडकीस आल्याचे समजताच त्याने रम्याला दोघे एकत्रच मरूया, असे म्हणत खिशातील गावठी बॉम्ब काढले आणि तिच्यावर चाकूने वार केले.

गावठी बॉम्बचा वापर

कार उडवण्यासाठी गावठी बॉम्बचा वापर करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तुमकूरचे पोलिसप्रमुख व्यंकट यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान आणखी एक गावठी जिवंत बॉम्बही आढळून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT