Prajwal Revanna  Pudhari
राष्ट्रीय

Prajwal Revanna accused | देवेगौडांचा नातू माजी खासदार प्रज्वल रेवण्णा बलात्कारप्रकरणी दोषी; शनिवारी सुनावणार शिक्षा, कोर्टात रडला...

Prajwal Revanna accused | 14 महिन्यांत निकाल, लैंगिक अत्याचार करून केले होते व्हिडिओ रेकॉर्डिंग

पुढारी वृत्तसेवा

Prajwal Revanna accused in rape case

बंगळुरू : कर्नाटकातील निधर्मी जनता दलाचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना एका गृहोद्योग कामगार महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणाचा निकाल केवळ 14 महिन्यांत लागला असून, शिक्षेची घोषणा शनिवार (2 ऑगस्ट) रोजी करण्यात येणार आहे.

प्रज्वल रेवण्णा यांच्यावर मैसूर जिल्ह्यातील के. आर. नगर येथील एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणाची नोंद कर्नाटक सीआयडीच्या सायबर क्राइम स्टेशनमध्ये झाली होती. पीडित महिलेने कोर्टात दिलेल्या साक्षीमध्ये सांगितले की, तिच्यावर दोन वेळा बलात्कार करण्यात आला आणि त्या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले.

माजी पंतप्रधानांचा नातू, माजी मुख्यमंत्र्यांचा पुतण्या 

प्रज्वल रेवण्णा हे एच. डी. देवेगौडा यांचा नातू आहे. एच.डी. देवेगौडा हे भारताचे माजी पंतप्रधान आणि जनता दल (सेक्युलर) पक्षाचे संस्थापक नेते होत. त्यांचा मुलगा एच. डी. रेवण्णा यांचा प्रज्वल हा पुत्र आहे. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा तो पुतण्या आहे.

जलदगतीने चाललेली न्यायप्रक्रिया

या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या विशेष तपास पथकाने (SIT) केला. महिला निरीक्षक शोभा यांच्या नेतृत्वाखालील SIT ने 123 पुरावे गोळा करून जवळपास 2000 पानी आरोपपत्र न्यायालयात सादर केले. न्यायालयाने केवळ 7 महिन्यांत 23 साक्षीदारांची चौकशी केली.

साडीवरील वीर्याचे नमुने

पीडित महिलेने पुरावा म्हणून एक साडी सादर केली होती, जी तिने अनेक महिने जपून ठेवत होती. फॉरेन्सिक तपासात त्या साडीवर वीर्याचे अंश आढळले, जो पुरावा न्यायालयाने स्वीकारला आणि तो निर्णयात महत्त्वाचा ठरला.

दोषी ठरवलेले कलम

प्रज्वल रेवण्णा यांच्यावर खालील IPC कलमांअंतर्गत दोषी ठरवण्यात आले:

  • IPC कलम 376(2)(k) आणि 376(2)(n) – किमान 10 वर्षे, अधिकतम जन्मठेप

  • IPC कलम 354(A), 354(B), 354(C) – तीन वर्षांपर्यंत शिक्षा

  • IPC कलम 506 – सहा महिने

  • IPC कलम 201 – एक ते सात वर्षे

  • IT Act 2008 अंतर्गत कलम 66(E) – तीन वर्षांपर्यंत शिक्षा

कोर्टात रडले रेवण्णा

निकालानंतर प्रज्वल रेवण्णा न्यायालयात भावुक झाले व रडताना दिसले. न्यायालयातून बाहेर पडताना त्यांनी डोळ्यांत अश्रू होते.

शिक्षेची घोषणा शनिवारी

या प्रकरणात शिक्षेची घोषणा २ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष न्यायालयात होणार आहे. हे प्रकरण जलदगतीने चालवल्यामुळे आणि दोषी सिद्ध होण्यास लागलेला अल्प वेळ न्याय व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT