Epstein File Indian Girl Name pudhari Photo
राष्ट्रीय

Epstein File Indian Girl Name: एपस्टीन फाईलमध्ये 'त्या' भारतीय मुलीचा उल्लेख कसा आला.. तो कोणी केला?

एपस्टीननं एका भारतीय महिलेला देखील आपलं शिकार बनवलं होतं. ही माहिती अमेरिकेच्या न्याय विभागानं नुकतेच प्रसिद्ध केलेल्या नव्या फाईल्समधून समोर आली आहे.

Anirudha Sankpal

Epstein File Indian Girl Name: अमेरिकेच्या न्याय विभागाकडून जेफ्री एपस्टीन संदर्भातील ३ मिलियनपेक्षा जास्त पानं आणि २००० पेक्षा जास्त व्हिडिओ सार्वजनिक करण्यात येत आहेत. यात १.८ लाख फोटोंचा देखील समावेश आहे. यातील एकून ३.५ मिलियन पेज सार्वजनिक झाले असून न्याय विभागानं अत्यंत सावधानीनं या फाईल प्रसिद्ध करत आहे.

भारतीय मुलीचा आला उल्लेख

एपस्टीन फाईलमध्ये जसजसे खुलासे होत आहेत तसतसे अनेक देशांचे राजकारणी आणि विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती स्पष्टीकरण पदाचे राजीनामे देत आहेत. या फाईलमुळं भारतात देखील राजकीय भूकंप येत आहेत. आतापर्यंत या फाईलमध्ये अनेक भारतीयांची नावे आली आहेत. मात्र आता एका मुलीचं नाव पहिल्यांदाच येत आहे. एपस्टीननं एका भारतीय महिलेला देखील आपलं शिकार बनवलं होतं. ही माहिती अमेरिकेच्या न्याय विभागानं नुकतेच प्रसिद्ध केलेल्या नव्या फाईल्समधून समोर आली आहे.

न्याय विभागानं प्रसिद्ध केलेल्या नव्या फाईल्समध्ये अमेरिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांमधील एक संवादाचा उल्लेख आहे. यात हे अधिकारी एका भारतीय मुलीला शोधून तिला न्याय देण्याचे आणि भरपाई देण्याबाबत बोलत आहेत.

कधीचा आहे उल्लेख?

भारतीय मुलीचा एपस्टीन संदर्भातील ईमेलमध्ये १३ जानेवारी २०२० मध्ये उल्लेख आला आहे. या ईमेल मध्ये पीडितेकडून केस लढणारी लॉ फर्म EDWARDS POTTINGER LLC चे वकील ब्रिटनी हेन्डरसन अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना एक ईमेल करतात. त्यात त्या काही पीडित मुली या थेरपी घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी फ्लोरिडा आणि न्यूयॉर्कच्या काही पीडित मुलींची नावे देखील अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना दिली.

काय संभाषण झालं?

या ईमेलमध्ये एक पीडित ही भारतीय मुलगी असल्याचं देखील लिहिलं गेलं आहे. ती भारतातच आहे असं देखील त्या वकील लिहितात. अमेरिकेचे प्रशासन त्या पीडित मुलीची कशी मदत करणार. वकील विचारतात की तिला देखील थेरपीचे ६ मोफत सेशन मिळू शकतात का? त्या वकील या पीडित मुलीला भारतात देखील ही सेवा उपलब्ध होऊ शकते का अशी विचारणा करतात.

दरम्यान, याबाबत अधिकारी उत्तरात या पीडित मुलींना भरपाई देण्याबाबत बोलत आहेत. अमेरिकेत ही व्यवस्था न्यूयॉर्कच्या ऑफिस ऑफ विक्टिम सर्व्हिसेस द्वारे ही सुविधा दिली जाते. यासाठी इमर्जन्सी व्हिक्टिम मदत निधी देखील आहे. याद्वारे पीडितांना आरोग्यासंदर्भातील मदत केली जाते. अशा प्रकारची मदत भारतीय पीडित मुलीला देखील मिळवण्यासाठी तिची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला जात होता.

ती भारतीय मुलगी कोण?

एपस्टीनच्या कचाट्यात सापडलेली ही भारतीय मुलगी कोण होती याबाबतची माहिती समोर आलेली नाही. या ईमेलमध्ये त्या मुलीच्या प्रायव्हसीची काळजी घेण्यात आली असून तिचं नाव लपवण्यात आलं आहे. अनेक गुन्ह्यांच्याबाबतीत पीडितेचं नावं सार्वजनिक केलं जात नाही. याचा उद्येश हा पीडित व्यक्तीच्या सुरक्षेची काळजी घेणं असा असतो. मात्र ट्विटवर यावरून अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

एपस्टीन फाईल्स अमेरिकेच्या फायनान्सर, प्रभावशाली व्यक्ती आणि अल्पवयीन लैंगिक शोषण करणारा जेफ्री एपस्टीन यांच्याशी संबंधित आहेत. या प्रकरणाबाबत लाखो कागदपत्रे, इमेल, फ्लाईट लॉग, फोटो आणि व्हिडिओ संग्रहित करून ठेवण्यात आलेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT