JEE Mains 2026 
राष्ट्रीय

JEE Main 2026 Exam Dates : 'एनटीए'ने जाहीर केल्‍या जेईई मेन परीक्षेच्या तारखा, पाहा सूचना

नोंदणी प्रक्रिया ऑक्टोबर २०२५ मध्ये अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर सुरू होणार

पुढारी वृत्तसेवा

JEE Main 2026 Exam Dates

नवी दिल्‍ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने जेईई मेन २०२६ परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ही परीक्षा जानेवारी आणि एप्रिल दोन्ही सत्रांमध्ये घेतली जाईल. एनटीएनुसार, सत्र १ परीक्षा २१ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान घेतली जाईल आणि नोंदणी प्रक्रिया ऑक्टोबर २०२५ मध्ये अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर सुरू होईल.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने जेईई (मेन) २०२६ साठी अधिक उमेदवारांना सामावून घेण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये उमेदवारांना लांबचा प्रवास करावा लागू नये म्हणून परीक्षा केंद्रांची संख्या वाढवणे समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, प्रत्येकजण सहजपणे परीक्षा देऊ शकेल याची खात्री करण्यासाठी अपंग उमेदवारांच्या विशेष गरजा पूर्ण केल्या जात आहेत.

परीक्षेच्‍या तारखा

  • सत्र १ (जानेवारी २०२६) सुरु होईल. ऑक्टोबर २०२५ पासून ऑनलाइन अर्ज सादर करणे

  • परीक्षेच्या तारखा २१-३० जानेवारी २०२६ या कालावधीत होईल.

  • सत्र २ (एप्रिल २०२६)

  • जानेवारी २०२६ च्या शेवटच्या आठवड्यापासून ऑनलाइन अर्ज सादर करणे

  • परीक्षेच्या तारखा १-१० एप्रिल २०२६

अर्जातील आधार आणि नावासाठी सूचना पहा

एनटीए आधार प्रमाणीकरणाद्वारे उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, लिंग, फोटो आणि पत्ता यूआयडीएआय कडून मिळवेल. आधारमध्ये कोणतेही बदल करण्यासाठी उमेदवारांनी यूआयडीएआय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. तथापि, वडील/आई/पालकांची नावे इत्यादी आधारमध्ये नोंदवलेली नाहीत, त्यामुळे उमेदवारांना ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये ही माहिती स्वतंत्रपणे प्रविष्ट करावी लागेल. उमेदवाराचे नाव आधार कार्ड आणि दहावीच्या शैक्षणिक प्रमाणपत्र/गुणपत्रिकेशी जुळत नसेल, तर अर्ज भरताना ही दुरुस्ती करण्याचा पर्याय उपलब्ध असेल, असेही एनटीएने आपल्‍या सूचनेत स्‍पष्‍ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT