

मुंबई : देशभरातील आयआयटी संस्थांमध्ये अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी 18 मे रोजी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा घेण्यात आली. दोन सत्रात घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या मागील 10 वर्षांच्या तुलनेत जवळपास निम्मी होती.
प्रश्नपत्रिकेतील तीन विभागांमधील प्रत्येक विभागामध्ये प्रत्येकी 18 असे 54 प्रश्न विचारण्यात आले होते. यंदा 18 मे रोजी घेण्यात आलेली जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा गतवर्षीप्रमाणे 180 गुणांची घेण्यात आली. पहिले सत्र सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरे सत्र दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत घेण्यात आले. पहिल्या सत्रात पेपर 1 घेण्यात आला तर दुसर्या सत्रात पेपर 2 घेण्यात आला. दोन्ही पेपरमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित असे तीन विभाग होते. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एकूण 54 प्रश्न होते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या प्रत्येक विभागात 18 प्रश्न विचारण्यात आले होते. गेल्या दोन वर्षात विचारलेल्या प्रश्नांच्या तुलनेत यंदा प्रश्नपत्रिकेत 51 प्रश्न कमी विचारण्यात आले होते. मागील दोन वर्षांमध्ये जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेमध्ये 102 प्रश्न विचारण्यात आले होते.