Jan Suraaj On Bihar election results
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकांसाठी (Bihar election results) आचारसंहिता लागू होण्याच्या एक तास आधी १४,००० कोटी रुपये काढून राज्यातील १.२५ कोटी महिलांना वाटण्यात आले. केंद्र सरकारने जागतिक बँकेकडून दुसऱ्या प्रकल्पासाठी निधी घेतला घेतला आणि तो महिला मतदारांना वाटला, असा गंभीर आरोप जन सुराज (Jan Suraaj) पक्षाचे प्रवक्ते पवन वर्मा (Pavan Verma0 यांनी केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत पूर्वश्रमीचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाचा नामुष्कीजनक पराभव झाला आहे. या निवडणुकीत सर्वात आधी मैदानात उतरलेल्या या पक्षाची पाटी कोरी राहिला. बिहार निवडणूक निकालाबाबत वृत्तसंस्था 'एएनआय'शी बोलताना पवन वर्मा म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत १.२५ कोटी महिला मतदारांच्या खात्यात १०,००० रुपये हस्तांतरित करण्यात आले होते. सध्या बिहारमधील सार्वजनिक कर्ज ४,०६,००० कोटी आहे. दररोज व्याज ६३ कोटी आहे आणि खजिना रिकामा असल्याचा दावा केला.
वर्मा यांनी असा दावा केला की राज्यातील महिलांना देण्यात येणारे १०,००० रुपये हे जागतिक बँकेकडून दुसऱ्या प्रकल्पासाठी आलेल्या २१,००० कोटी रुपयांमधून घेतले गेले होते. निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्याच्या एक तास आधी १४,००० कोटी रुपये काढून राज्यातील १.२५ कोटी महिलांना वाटण्यात आले," असा आरोप त्यांनी केला. मी म्हटल्याप्रमाणे, ही आमची माहिती आहे. जर ते चुकीचे असेल तर मी माफी मागतो; पण जर ते खरे असेल तर प्रश्न उद्भवतो की हे किती नैतिक आहे," असा सवालही त्यांनी केला.
बिहारमध्ये पुन्हा रालोआचे सरकार आले नाही तर महिलांना उर्वरित रक्कम हस्तांतरित केली जाणार नाही, अशी अफवा पसवली गेली. एकूण चार कोटी महिलांपैकी २.५ कोटी महिलांना अद्याप रक्कम मिळालेली नाही आणि त्यांना असे वाटते की एनडीए सत्तेत आले नाही तर त्याचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, असेही पवन वर्मा म्हणाले.
राज्याच्या कानाकोपऱ्यात दारू जास्त किमतीत विकली जात आहे.ज्यांना त्यांचे घर चालवावे लागते त्यांच्यावर याचा परिणाम होणार नाही का?", असा सवाल करत प्रशांत किशोर यांनी दारुबंदी उठविण्याची दिलेले आश्वासन योग्यच होते. त्यामुळे आमचा पराभव झाला नाही तर सत्ताधार्यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी केलेल्या दहा हजार रुपयांच्या हस्तांतरणामुळे आणि महिलांबद्दल धोरणांमुळे पराभवाला सामोरे जावे लागले, असेही वर्मा यांनी सांगितले.