Jamnagr Murder | आणखी एका पतीचा बळी! प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा  
राष्ट्रीय

Jamnagar Murder | आणखी एका पतीचा बळी! प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला; ‘दृश्यम’ सारखा मृतदेह १२ फूट काँक्रीटखाली गाडला!

जामनगर गुजरात येथील घटनेने सारेच चक्रावले, पती ऑस्ट्रेलियात असल्याचा बनाव, २ वर्षे रचलेला बनाव पोलिसांनी केला उघड, घटनेने जामनगर मध्ये खळबळ

Namdev Gharal

Jamnagar Murder चित्रपटातील स्टोरीलाही मागे टाकेल अशी एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना गुजरातमध्ये उघडकीस आली आहे. गुजरातच्या जामनगर येथील एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह दारेड GIDC या औद्योगिक वसाहतीत एका इमारतीच्या पायात तब्बल १२ फूट खोल काँक्रीटखाली पुरला. विशेष म्हणजे, पती बेपत्ता झाल्याची शंका येऊ नये म्हणून पत्नीने नातेवाइकांना सांगितले की, "ते कामासाठी ऑस्ट्रेलियात गेले आहेत आणि तिथल्या कंपनीत मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे

याबाबत अधिक माहिती अशी की फर्निचरचे व्यापरी जिग्नेश धर्माभाई मावडिया (वय ३५ वर्षे )हे होते त्‍यांची पत्‍नी व पृथ्वी उर्फ भूमीबेन मावडिया हे दोघे जामनगरमध्ये राहत होते. पृथ्वी हिचे निलेश मानसुखभाई कछोटिया याच्या बरोबर अनैतिक संबध हाते. पती जिग्नेश त्‍यांच्यात अडसर हाते यातून त्‍यांनी त्‍यांचा काटा काढायचा ठरवला.

सायनाईड दारुत मिसळले

३१ मे २०२४ च्या रात्री, आरोपींनी जिग्नेशला दारेड GIDC मधील एका बांधकाम सुरु असलेल्या कारखान्याच्या शेडमध्ये दारूच्या पार्टीच्या बहाण्याने बोलावले. तिथे त्याच्या दारूत सायनाईड हे जहाल विष मिसळून त्याची हत्या करण्यात आली.

अशी लावली मृतदेहाची विल्हेवाट

आपल्या कृत्‍याचा कुणाला शंका येऊ नये म्हणून त्‍यांनी मृतदेह त्याच कारखान्याच्या शेडमध्ये तब्बल १२ फूट खोल खड्डा खणून गाडला, वरून माती टाकली आणि १ फूट जाडीचा सिमेंट-काँक्रीटचा थर टाकून जमीन पक्की केली. जेणेकरून कसलाही वास येणार नाही किंवा शंका येणार नाही. याची खात्री केली

आस्ट्रेलियाला गेल्याचा बनाव

दरम्यान नातेवाईंकांनी जिग्नेशचा संपर्क होत नसल्याने पृथ्वीकडे सारखी चौकशी सुरु केली. पृथ्वीने मग ते कामानिमित्त ऑस्ट्रेलियसात गेले आहेत असा बनाव केला. तिथे फोन किंवा मोबाईल वापण्यास परवानगी नाही अशी थापही मारली. सलग दोन वर्षे हेच कारण ती नातेवाईकांना सांगत होती त्‍यांनीही विश्वास ठेवला

अस फूटलं भांडं

जिग्नेशचा एक चुलत भाऊ काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला जाण्याची तयारी करत होता. त्याने पृथ्वीकडे जिग्नेशचा ऑस्ट्रेलियन पत्ता आणि संपर्क क्रमांक मागितला, जेणेकरून तो तिथे त्याला भेटू शकेल. त्‍यानंतर ती प त्ता देण्यास टाळाटाळ करु लागली. यामुळे नातेवाइकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांत जाण्याची धमकी दिली. अखेर घाबरून तिने हत्येची कबुली दिली. त्यानंतर जिग्नेशचा भाऊ अशोक मावडिया याने २६ जुलै रोजी जामनगर सिटी 'बी' डिव्हिजन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

जामनगरच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक (ASP) प्रतिभा यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आरोपींना सोबत घेऊन ड्रिल मशीनच्या साह्याने काँक्रीट फोडून उत्खनन केले. तिथून मानवी सांगाडा सापडला आहे. या घटनेची स्थिती पाहून पोलिस चक्रावून गेले आहेत. पोलिसांनी पत्‍नी पृथ्वी, प्रियकर निलेश व त्‍यांना मृतदेह पूरण्यात सहाय करणारा बलवीर वर्मा या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT