Jammu Kashmir Terrorism Representive Imges
राष्ट्रीय

Jammu Kashmir Terrorism | गुप्त अ‍ॅपद्वारे दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; एनआयएच्या तपासात उघड

Jammu Kashmir Terrorism | पाहलगाम हल्ल्यात १० हून अधिक स्थानिकांचा सहभाग; एन्क्रिप्टेड मेसेजिंगचा वापर

पुढारी वृत्तसेवा

Jammu Kashmir Terrorism

अनंतनाग : वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात चार हल्लेखोरांना १० स्थानिक संशयितांनी मदत केल्याचे तपासातून पुढे आले आहे. एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप्सचा वापर करून स्थानिक दहशतवाद्यांनी हल्लेखोरांसोबत समन्वय ठेवल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या (एनआयए) चौकशीतून पुढे आले आहे.

२३ एप्रिलपासून एनआएच्या पथकांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे. एनआयएचे आयजी, डीआयजी आणि एसपी यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी तपास करत असून, प्रत्यक्षदर्शीना चौकशीसाठी बोलावले जात आहे.

२२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरन गवताळ भागात हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. एनआयएचे पथक आत आणि बाहेर पडणाऱ्या मार्गाची कसून तपासणी करत असून, दहशतवाद्यांच्या कार्यपद्धतीचा मागोवा घेत आहेत.

फॉरेन्सिक व अन्य तज्ज्ञ संपूर्ण परिसरात पुराव्यांचा शोध घेत आहेत, ज्याद्वारे या भीषण कटाचा पर्दाफाश होईल, अशी अपेक्षा आहे. हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने परिसरात सतर्कतेची पातळी वाढवली आहे आणि दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोध मोहिमा राबविल्या जात आहेत.

पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत व्यापक निदर्शन होत आहेत. दरम्यान, हल्ल्यानंतर दहशतवादी बैसरनहून आरू-नगबलच्या घनदाट जंगलांमध्ये गेले. तिथून नगबल नाला मार्गे पश्चिमेकडे खिरम आणि श्रीशैलम भागात पोहोचण्याचे मार्ग आहेत. तसेच आरूच्या वरच्या छोट्या ट्रेकिंग रूटस्ने पुलवामा किंवा अनंतनागच्या दिशेने जाण्याचे रस्ते आहेत.

हल्ल्याआधी ड्रोनद्वारे रेकी !

प्राथमिक तपास व गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, हल्ल्याच्या पाच दिवस आधी बैसरन परिसरात चीनमध्ये बनवलेला ड्रोन उडताना दिसला होता. याशिवाय स्थानिक घोडेवाले वापरून रेकी केल्याचा संशय आहे. तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत.

पहलगाम परिसरात कोणतेही असामान्य रेडिओ सिग्नल ट्रॅफिक होते का, याची इस्त्रोच्या वतीने पाहणी करण्यात येणार आहे. दहशतवाद्यांनी स्थानिक घोडेवाल्यांना पैसे देऊन क्षेत्राची रेकी करवली असल्याचा संशय आहे. त्यांनी स्थानिक वेशभूषा आणि ओळखपत्रे वापरून पर्यटकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला.

  1. अनंतनाग हल्ल्यात १० स्थानिक संशयितांचा सहभाग; एनआयएचा धक्कादायक तपास

  2. ड्रोन, मेसेजिंग अ‍ॅप्स आणि घोडेवाले! अनंतनाग हल्ल्याच्या कटाचा पर्दाफाश

  3. बैसरन हल्ल्याआधी रेकी; स्थानिक घोडेवाल्यांचा वापर केल्याचा संशय

  4. एनआयएच्या तपासात नवे खुलासे; दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत!

  5. २६ मृतांचा बळी घेतलेला हल्ला पूर्वनियोजित? ड्रोनद्वारे आधीच रेकी!

  6. दहशतवादी बैसरनहून जंगलात पसार; लष्कराची शोध मोहीम सुरू

  7. एनआयएचे आयजी, डीआयजी घटनास्थळी; सखोल तपास सुरू

  8. हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट; पाकिस्तानविरोधात निदर्शनं तीव्र

  9. दहशतवादी पर्यटकांत मिसळले; स्थानिक वेशभूषा व ओळखपत्रांचा वापर

  10. ISRO कडून रेडिओ सिग्नल तपासणी; हल्ल्याचे तांत्रिक पुरावे गोळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT