ISRO Satellite x
राष्ट्रीय

ISRO चा स्पाय सॅटेलाईट ठेवणार पाकिस्तानवर नजर; प्रक्षेपणासाठी हालचाली वेगवान

ISRO Spy Satellite: हा उपग्रह दिवसा व रात्री, तसेच कोणत्याही हवामानात, कोणत्याही वेळेला, भारताच्या सीमेवर घडणाऱ्या घडामोडींवर नजर ठेवेल.

Akshay Nirmale

ISRO Speeds Up Launch Of Special Spy Satellite

नवी दिल्ली: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी आणि सातत्याने नजर ठेवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) एका विशेष स्पाय सॅटेलाईट (उपग्रह) च्या प्रक्षेपणासाठी वेगाने काम करत आहे.

ISRO लवकरच एक विशेष "रडार इमेजिंग उपग्रह" प्रक्षेपित करण्यास सज्ज आहे. हा उपग्रह दिवसा व रात्री, तसेच ढगाळ हवामानातही चित्रण करू शकतो.

त्यामुळे कोणत्याही हवामानात, कोणत्याही वेळेला, भारताच्या सीमेवर घडणाऱ्या घडामोडींवर नजर ठेवणे शक्य होणार आहे. NDTV ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

अचूक निरीक्षक असलेला स्पाय सॅटेलाईट

हा उपग्रह "स्पाय सॅटेलाइट" (गुप्तचर उपग्रह) म्हणून ओळखला जातो कारण त्याच्यापासून लपणे फार कठीण आहे. हा आकाशातील एक अचूक निरीक्षक आहे.

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, ISRO लवकरच PSLV-C61 मोहीम अंतर्गत अत्याधुनिक EOS-09 उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे.

C-बँड सिंथेटिक अपर्चर रडारने सुसज्ज असलेला EOS-09 उपग्रह कोणत्याही हवामानात, दिवसा अथवा रात्री, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे हाय-रिझोल्यूशन चित्र घेण्यास सक्षम आहे.

मेक इन इंडिया उपग्रह

हा रडार इमेजिंग उपग्रह पूर्णतः भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे, आणि तो भारताच्या आंतराळात कार्यरत असलेल्या 50 हून अधिक उपग्रहांच्या ताफ्यात सामील होणार आहे.

भारताचा आधीपासून कार्यरत असलेला Cartosat-3 उपग्रह कमी पृथ्वी कक्षेतून अर्धा मीटरपेक्षा कमी रिझोल्यूशनमध्ये चित्रे पाठवू शकतो.

मात्र, तो उपग्रह रात्री चित्रण करू शकत नाही, ज्यामुळे शत्रू आपली साधने हालवू शकतो. पण, नवीन EOS-09 उपग्रह अंध होत नाही, आणि त्यामुळे शत्रू काय लपवत आहे हे सतत शोधून काढू शकतो.

इस्त्रोची कामगिरी

​भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) 1975 पासून आतापर्यंत एकूण 129 भारतीय उपग्रह आणि 342 परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. म्हणजेच एकूण 417 उपग्रह इस्रोने आत्तापर्यंत प्रक्षेपित केले आहेत.

त्यापैकी 21 उपग्रह संचार, 8 उपग्रह नेव्हिगेशन, 21 उपग्रह पृथ्वी निरीक्षण आणि 3 उपग्रह विज्ञान या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. ​

 या उपग्रहांचाही लष्करी वापर...

सन 2009 मध्ये सोडलेला RISAT-2, त्यानंतर 2019 मध्ये सोडण्यात आलेले RISAT-2B आणि RISAT-2BR1, एप्रिल 2019 मध्ये सोडलेला EMISAT, Cartosat-2 Series (High-resolution Earth Observation Satellites)

तसेच फेब्रुवारी 2022 मध्ये प्रक्षेपित केलेला EOS-04 (RISAT-1A) या उपग्रहांचा वापरही लष्करी कारणांसाठी केला जातो. याशिवाय यंदा 2025 मध्ये EOS-09 (Upcoming Spy Satellite) प्रक्षेपित केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT