ISRO recruitment  File Photo
राष्ट्रीय

ISRO recruitment 2026: इस्रोमध्ये काम करण्याचे स्वप्न होणार पूर्ण! विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा संपूर्ण माहिती

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) सतीश धवन अंतराळ केंद्रात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

मोहन कारंडे

ISRO recruitment 2026:

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेअंतर्गत (ISRO) येणाऱ्या सतीश धवन अंतराळ केंद्रात विविध पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मल्टी टास्किंग स्टाफ यांसह अनेक पदांचा समावेश आहे.

अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ०९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

विविध तांत्रिक पदांसाठी संबंधित विषयात मान्यताप्राप्त संस्थेतून डिप्लोमा किंवा बी.एससी. पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. तर एमटीएस, ड्रायव्हर आणि इतर पदांसाठी उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण असावा. पदांनुसार उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे, तर कमाल वय २५ ते ३५ वर्षांदरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत लागू असेल.

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी यांच्या आधारे केली जाईल. यामध्ये बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. गुणवत्तेनुसार लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच पुढील स्किल टेस्टसाठी बोलावले जाईल.

अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील सोप्या टप्प्यांचा वापर करून ऑनलाईन अर्ज सादर करावा:

१. अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम shar.gov.in किंवा apps.shar.gov.in या वेबसाइटवर जा.

२. होमपेजवरील 'Apply Link' वर क्लिक करा आणि आपली वैयक्तिक माहिती भरा.

३. माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करा.

४. अर्ज संपूर्ण भरून झाल्यावर 'Submit' बटणावर क्लिक करा आणि अर्जाची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT