Pregnant teenager killed in Iran File Photo
राष्ट्रीय

Crime News: गर्भवती असल्याचे सांगताच १९ वर्षीय मुलीला पालकांकडून बेदम मारहाण; विष पाजले, तरीही जीव न गेल्याने गळा आवळून हत्या

इराणमध्ये दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे आई-वडिलांना सांगितल्यानंतर एका तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मोहन कारंडे

Honour killing in Iran

तेहरान: इराणमध्ये दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे आई-वडिलांना सांगितल्यानंतर एका तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिचे वय अवघे १९ ​​वर्षे असल्याचे समजते. शनिवारी (दि. २१) ही अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली असून, या प्रकरणी तरुणीच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे. मानवाधिकार संघटनेने या हत्येला ‘ऑनर किलिंग’ म्हटले आहे.

मृत तरुणीचे नाव हेलिया फत्ताही (वय १९) असे आहे. ती दोन महिन्यांची गर्भवती होती आणि एका तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. गेल्या आठवड्यात तिने आपल्या कुटुंबाला ही गोष्ट सांगितली, तेव्हा ते प्रचंड संतापले. तिच्या आई-वडिलांनी तिला जबरदस्तीने फिट्स येण्यावर दिली जाणारी सुमारे ३० गोळ्या खायला दिल्या. इतकेच नव्हे, तर तिला बेदम मारहाण केल्यानंतर उशीने तिचा श्वास कोंडून तिची हत्या केली.

'इराण इंटरनॅशनल'च्या वृत्तानुसार, ही घटना पश्चिम इराणमधील सानंदाज शहरात घडली. पोलिसांनी स्वतःच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी वोरिया फत्ताही आणि लैला वेइस या पालकांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान, दोघांनीही हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

औषधे दिल्यानंतरही तरुणी जिवंत होती

सुरुवातीला, शनिवारी (दि. २१) तिचे पालक मुलीविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी न्यायालयात गेले होते. घरी परतल्यावर त्यांनी तिला जबरदस्तीने औषध दिले. 'हेंगाऊ ऑर्गनायझेशन फॉर ह्युमन राइट्स'च्या माहितीनुसार, जेव्हा त्यांना कळाले की ती अजूनही जिवंत आहे, तेव्हा त्यांनी उशीने तिचा श्वास कोंडून तिची हत्या केली.

महिलांच्या हक्कांच्या संरक्षणाची मागणी

'हेंगाऊ' आणि 'हाना' या मानवाधिकार संघटनांनी या घटनेला 'ऑनर किलिंग' असे म्हटले आहे. 'हेंगाऊ'ने म्हटले आहे की, "इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकाने महिला आणि मुलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी कायदे केलेले नाहीत. कायद्यातील त्रुटी आणि 'ऑनर किलिंग'च्या गुन्हेगारांना मिळणारी सौम्य शिक्षा यामुळे महिला हिंसाचाराच्या बळी ठरत आहेत. यामुळे गुन्हेगारांना मोकळीक मिळते आणि त्यांना शिक्षेची भीती उरत नाही."

इराणमधील महिलांची दयनीय अवस्था

या घटनेमुळे इराणमधील महिलांना सहन कराव्या लागणाऱ्या अत्याचारांबाबतची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अवघ्या एका आठवड्याभरात देशात घडलेली ही तिसरी घटना आहे, ज्यामध्ये एका तरुणीचा बळी गेला आहे. गेल्या बुधवारी (दि. १८) गिलान प्रांतात, २३ वर्षीय सदफ हकबिन हिची तिच्याच वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तिचा माजी प्रियकर, ज्याच्याशी लग्न करण्यास तिने नकार दिला होता, त्यानेच हे कृत्य केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT