iPhone 18 Pro AI Image
राष्ट्रीय

iPhone 18 ची प्रचंड क्रेझ! खरेदीसाठी दिल्ली, मुंबई, बेंगळूरमध्ये रात्रीपासूनच ॲपल स्टोअरबाहेर रांगा

ॲपलच्या iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची विक्री सुरू होण्यापूर्वीच देशातील प्रमुख शहरांमध्ये ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मोहन कारंडे

iPhone 18 Pro

नवी दिल्ली : ॲपलच्या iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची विक्री सुरू होण्यापूर्वीच देशातील प्रमुख शहरांमध्ये ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. दिल्ली, मुंबई आणि बेगळूर येथील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी झाली असून, अनेकजण रात्रीपासूनच रांगेत उभे राहून नवीन आयफोन सर्वात आधी खरेदी करण्याची प्रतीक्षा करत आहेत.

दिल्लीतील साकेत परिसरातील सेलेक्ट सिटीवॉक मॉलमधील ॲपल स्टोअरबाहेर पहाटेपासूनच ग्राहकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. अजय नावाच्या एका ग्राहकाने सांगितले की, त्यांनी iPhone 18 Pro Max चे 1TB मॉडेल आधीच प्री-बुक केले आहे. नवीन फोन सर्वात आधी खरेदी करण्यासाठी ते स्टोअरबाहेर प्रतीक्षा करत आहेत. सध्या ते iPhone 17 Pro वापरत असून, नवीन मॉडेलमधील फीचर्सची त्यांना उत्सुकता आहे.

यूट्यूबवर टेक रिव्ह्यू चॅनल चालवणाऱ्या सूरज चौहान हेही नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी स्टोअरबाहेर रांगेत उभे आहेत. ते म्हणाले, “मला स्मार्टफोनमध्ये खूप रस आहे. गेल्यावेळी मी iPhone 17 Pro खरेदी केला होता. यावेळी iPhone 18 Pro Max घेण्यासाठी आलो आहे. अनेक जण या फोनची आतुरतेने वाट पाहत आहेत. कॅमेरा आणि फोनच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.”

मुंबईतही ग्राहकांची मोठी गर्दी

मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेरही ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. एका ग्राहकाने सांगितले की, “आम्ही संपूर्ण रात्र इथे उभे आहोत. आम्ही खूप उत्सुक आहोत. आमच्याकडे बारकोड नसला तरी आम्ही रांगेत उभे आहोत.”

नाशिकहून मुंबईत आलेल्या हितेश पटेल यांनी सांगितले की, ते रात्री १० वाजल्यापासून रांगेत उभे आहेत. त्यांना सकाळी ८ वाजताचा पहिला स्लॉट मिळाला आहे. त्यानंतर त्यांना आपला फोन मिळणार आहे. “मी दरवर्षी माझा मोबाइल बदलतो. सध्या माझ्याकडे iPhone 17 Pro Max आहे. आता iPhone 18 Pro Max घेण्यासाठी आलो आहे,” असे त्यांनी सांगितले.

iPhone 18 सीरीजच्या विक्रीपूर्वीच दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये ग्राहकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. ॲपल स्टोअरबाहेर लागलेल्या लांबच लांब रांगा नव्या मॉडेलबाबत असलेली ग्राहकांची उत्सुकता अधोरेखित करत आहेत. नवीन आयफोनमध्ये कॅमेरा, कामगिरी आणि बॅटरी लाइफमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा ग्राहक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT