नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खाजगी सहायक विभव कुमार यांची आज (दि. २३) सक्तवसुली संचलनालयाने चौकशी केली.
मद्य धोरण घोटाळा प्रकरणाचा ईडी तसेच सीबीआयकडून तपास सुरु आहे. या घोटाळ्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांचेही नाव आले असून येत्या रविवारी त्यांची सीबीआयकडून चौकशी होणार आहे. आप नेत्यांच्या वतीने पक्षाचा संपर्क विभागाचा प्रमुख विजय नायर याने मद्य लॉबीकडून शंभर कोटी रुपये स्वीकारले होते. यातील काही पैसा गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी आम आदमी पक्षाकडून वापरण्यात आल्याचा दावा तपास संस्थांकडून करण्यात आलेला आहे.
हेही वाचा :