राष्ट्रीय

Indigo Flights Delays : इंडिगो विमानांना प्रचंड विलंब; अनेक विमानतळांवर सुमारे 200 विमानांची उड्डाणे रद्द!

मुंबई, हैदराबाद, बेंगळूरूसह अनेक विमानतळांवर प्रवाशांना सात ते आठ तासांचा विलंब

पुढारी वृत्तसेवा

Indigo Flights Massive Delays : इंडिगो एअरलाइनचे विमान प्रवासाचे वेळापत्रक खूपच बिघडले आहे. जवळपास दोन-तृतीयांश (60% हून अधिक) देशांतर्गत प्रवासी इंडिगोमधून प्रवास करतात. सरकारी आकडेवारीनुसार, मंगळवारी (2 डिसेंबर) इंडिगोची केवळ ३५ टक्‍के विमानांनी वेळवर उड्डाणे केली. इंडिगो दररोज 2,200 हून अधिक उड्डाणे करते. आज (दि.३) दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळूरूसारख्या अनेक विमानतळांवर दुपारपर्यंत जवळपास 200 विमानांची उड्डाणे रद्द झाली होती.

विमानांना विलंब आणि रद्द होण्‍यामागे कारण काय?

गेल्या महिन्यात नवीन "फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL)" नियम लागू झाले. हे नियम कर्मचाऱ्यांना (पायलट/केबिन क्रू) अधिक मानवीय पद्धतीने ड्युटीचे वेळापत्रका संदर्भात आहेत. यामुळे वैमानिकांची कमतरता तीव्र झाली आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी म्‍हटलं आहे की, काही विमानांसाठी केबिन क्रू पलब्ध नव्हते, त्यामुळे ती रद्द करावी लागली. अनेक विमानांना 7 ते 8 तासांपर्यंतचा विलंब होत आहे, ज्यामुळे मोठे गोंधळ निर्माण झाला आहे.

कंपनीने झालेल्‍या त्रासाबद्दल प्रवाशांची मागितली माफी

इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, तंत्रज्ञान समस्या, विमानतळांवरील गर्दी (Airport Congestion) आणि काही कामांसाठी आवश्यक असलेल्या गरजा अशा विविध कारणांमुळे गेल्या काही दिवसांत विमानांना उशीर झाला. तसेच काही रद्द करावी लागली. कर्मचारी लवकरात लवकर वेळापत्रक सामान्य करण्यासाठी काम करत आहेत. प्रवाशांना गरज भासल्यास दुसरे विमान पर्याय किंवा तिकिटाचे पैसे परत दिले जात आहेत. कंपनीने झालेल्‍या त्रासाबद्दल त्यांनी प्रवाशांची माफी मागितली आहे. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, विमानतळावर जाण्यापूर्वी https://www.goindigo.in/check-flight-status.html या वेबसाइटवर जाऊन आपल्या विमानाची अपडेट तपासावी.

दररोज सुमारे ५ लाखांहून अधिक लोकांचा देशांतर्गत विमान प्रवास

सध्या सुट्ट्या आणि सणांमुळे प्रवासाचा उच्च काळ सुरू आहे. दररोज सुमारे 5 लाखाहून अधिक लोक देशांतर्गत विमान प्रवास करत आहेत. देशांतर्गत विमान प्रवासात इंडिगोची विमान सेवा 60 टक्‍के पेक्षा जास्त आहे. त्‍यामुळे कंपनीच्‍या 65 टक्‍के विमानांना उशीर झाल्यास होणारा परिणाम खूप मोठा आहे. एका विमानाला उशीर झाल्यास, त्याचा परिणामपुढील अनेक उड्डाणांवर आणि बराच काळ जाणवत राहतो. दरम्‍यान, दिल्ली विमानतळासारख्या ठिकाणी इंडिगोची बॅगेज संदेश प्रणाली काम करत नसल्यामुळे सामान मिळवतानाही गोंधळाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT