Canva Image
राष्ट्रीय

India - Pakistan Tensions| तुर्कस्‍तानचा पाकिस्‍तानला पाठिंबा : ‘इंडिगो’ने तुर्कीश एअरलाईन्सशी संबध तोडले

Operation Sindoor | भारत पाकिस्‍तान युद्धात तुर्कस्‍तानची भूमिका भारत विरोधी

Namdev Gharal

नवी दिल्‍ली : भारताच्या इंडिगो एअरलाईनने तुर्कीश एअरलाईनसोबतचा करार थांबवण्याचा निर्णय आज शुक्रवारी जाहीर केला. ऑपरेशरन सिंदुर नंतर भारत पाकिस्‍तानमध्ये झालेल्‍या युद्धावेळी तुकस्‍तााने पाकिस्‍तानला मदत केली होती. यामुळे भारतात तुर्कस्‍तानविषयी रोष निर्माण झाला आहे. आहे आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगो व तुर्कीश एअरलाईन यांच्यामधील करार रद्द करेल असे सांगितले आहे.

दरम्‍यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्‍हणून या निर्णयाची तत्‍काळ अंमलबजावणी न करता ३ महिन्यानंतर ३१ ऑगस्‍ट रोजी पासून हा करार थांबणार आहे. सध्या इंडिगो कंपनी तुर्कीश एअरलाईनचे बोईंग ७७७ -३०० इआर या मॉडेलची दोन विमाने भाडेकरारावर वापरते. ही विमानसेवा दिल्‍ली आणि मुंबईतून - इस्‍तांबूल अशी सुरु आहे. हा भाडेकरार ३१ मे रोजी संपणार होता.

विमान महासंचलनालयाने म्‍हटले आहे की हा भाडेकरार एकवेळच आणि शेवटचाच असेल. ‘हा भाडेकरार कायमचा रद्द करण्यात येणार आहे आणि इंडिगो कंपनीसुद्धा करार वाढवण्याचा विचार करत नाही’ यापूर्वी नागरी विमान महासंचलनालयाला इंडिंगो कंपनीने भाडेकरार ६ महिने वाढवण्यासाठी विनंती केली होती. पण त्‍यांनी नियमाप्रमाणे प्रवाशांच्या सोयीचा विचार करता ती नाकरण्यात आली.

ऑपरेशन सिंदुर नंतर भारत - पाकिस्‍तान यांच्यात तणाव सुरु आहे. युद्धावेळी भारताने केलेल्‍या हवाई हल्‍ल्‍यानंतर तुर्कीए ने भारतावर टीका केली होती. त्‍यामुळे भारत - तुर्की यांच्यातील राजकीय संबध सध्या दुरावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण सुरक्षा विभाग (BCAS) ने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने टर्कीच्या सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस या कंपनीची सुरक्षा मान्यता रद्द केली आहे.

तसेच देशभरात अनेक प्रवासी संघटनांनी भारतीय नागरिकांनी तुर्कीला प्रवास न करण्याच्या सूचना केल्‍या आहेत. इंडिगोने यापूर्वी तुर्की एअरलाइन्ससोबतच्या भागीदारीचे भारतीय प्रवाशांना होणारे फायदे, रोजगार निर्मिती आणि हवाई संपर्क वृद्धी याचा दाखला देत करार वाचवण्याचा प्रयत्‍न केला होता. मात्र, इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी शुक्रवारी सांगितले की, ‘आम्ही सध्या सर्व नियमांचे पालन करत आहोत आणि भविष्यातही सरकारच्या सर्व नियमांचे पालन करु’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT