Indigo Flight Cancellation  Pudhari
राष्ट्रीय

Indigo Flight Cancellation: इंडिगोचा मोठा निर्णय! फ्लाइट रद्द झालेल्या प्रवाशांना मिळणार 10,000 रुपयांचे व्हाउचर

Indigo Flight: फ्लाइट रद्द झाल्यामुळे प्रवाशांना इंडिगोने 10,000 रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर देण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या नियमांनुसार 24 तासांच्या आत फ्लाइट रद्द झाल्यास प्रवाशांना अतिरिक्त 5,000–10,000 रुपयांची नुकसान भरपाई मिळू शकते.

Rahul Shelke

Indigo Flight Cancellation Compensation India: इंडिगोच्या फ्लाइट रद्द झाल्यामुळे हजारो प्रवासी अडचणीत सापडले होते, त्याबद्दल इंडिगोने दिलगिरी व्यक्त करत मोठी घोषणा केली आहे. 3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी ज्यांच्या फ्लाइट रद्द झाल्यात, अशा प्रत्येक प्रवाशाला कंपनीकडून 10,000 रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर देण्यात येणार आहे. हे व्हाउचर पुढील एक वर्षभर कोणत्याही इंडिगो फ्लाइट बुकिंगमध्ये वापरता येणार आहे.

कंपनीने मान्य केले की तीन दिवस अनेक प्रवाशांना तासंतास विमानतळावर थांबावे लागले, काहींच्या कनेक्टिंग फ्लाइट्स चुकल्या, तर काहींची महत्त्वाची कामे झाली नाहीत. इंडिगोने म्हटलं आहे की, “हा काळ आमच्यासाठी आणि प्रवाशांसाठी कठीण होता. या गैरसोयीची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो.”

24 तासांच्या आत फ्लाइट रद्द झाली तर काय मिळणार?

भारताच्या नागरी विमान वाहतूक नियमांनुसार, 24 तासांच्या आत फ्लाइट रद्द झाल्यास एअरलाइनला प्रवाशांना भरपाई देणे बंधनकारक आहे.

या नियमांनुसार:

  • प्रवासाचे अंतर

  • फ्लाइटचा कालावधी

या आधारे प्रवाशांना 5,000 ते 10,000 रुपये अतिरिक्त भरपाई मिळू शकते. याचा अर्थ अंतर जास्त असेल तर काही प्रवाशांना एकूण 20,000 रुपयापर्यंतची भरपाई मिळण्याची शक्यता आहे.

रिफंड प्रक्रिया वेगाने सुरू

इंडिगोने सांगितले की रद्द झालेल्या फ्लाइट्सची रिफंड प्रक्रिया करण्यात येत असून उर्वरित रिफंड लवकरच दिला जाणार आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्म, ट्रॅव्हल एजन्सी किंवा अॅपद्वारे बुकिंग केलेले तिकीटही रिफंडच्या प्रक्रियेत आहे. ज्यांना रिफंडची माहिती मिळत नसल्यास ते थेट मेलद्वारे संपर्क करू शकतात: customer.experience@goindigo.in

10,000 रुपयांचे व्हाउचर का दिले जात आहे?

कंपनीच्या म्हणण्यानुसार:

  • प्रवासी तासंतास रांगेत उभे राहिले

  • काहीजण रात्रभर विमानतळावर अडकले

  • पुढील प्रवासाचे नियोजन बिघडले

यामुळे प्रवाशांना 10,000 रुपयांचे व्हाउचर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिगोने म्हटले आहे “आमच्या सेवा पुन्हा स्थिर आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी आम्ही प्रत्येक पाऊल उचलत आहोत. प्रवाशांनी दाखवलेल्या संयमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT