North Sentinel Island 
राष्ट्रीय

North Sentinel Island | कल्पनेपलीकडचं वास्तव; पंतप्रधानांनाही प्रवेशबंदी असलेलं भारतातील रहस्यमय बेट माहितेय का!

North Sentinel Island | भारताचं असं ठिकाण जिथं तुमचं पाऊल टाकणंही ठरू शकतो गुन्हा; या बेटाच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकार एवढं का सतर्क आहे? जाणून घ्या कारण

shreya kulkarni

अत्यंत दुर्गम आणि जगापासून पूर्णपणे अलिप्त असलेल्या नॉर्थ सेंटिनेल बेटावरील सेंटिनेली आदिवासींना भेटण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे २४ वर्षीय अमेरिकन युट्यूबर मायखाइलो विक्टोरोविच पोल्याकोव्ह याला अटक करण्यात आली. या युट्यूबरने आदिवासींसाठी डाएट कोकची कॅन आणि नारळ बेटावर ठेवले होते, आणि यामुळे तो सध्या भारतीय कायद्यानुसार अडचणीत सापडला आहे.

एका गूढ बेटाची कहाणी :  नॉर्थ सेंटिनेल का इतकं खास आहे?

विस्तीर्ण महासागरात, भारताच्या दक्षिणेला एक छोटंसं, हिरवंगार बेट आहे. 'नॉर्थ सेंटिनेल' बाहेरून पाहिलं, तर ते एखाद्या स्वप्नातल्या जागेसारखं वाटतं, समुद्राच्या निळ्या लाटांनी न्हालेलं, नारळाच्या झाडांनी भरलेलं... पण हे बेट फक्त निसर्गरम्य नाही, ते संरक्षणाचं एक दुर्मिळ प्रतीक आहे.

सेंटिनलीज या बेटावर राहतात एक जुनी आदिवासी जमात, जी शेकडो वर्षांपासून बाहेरच्या जगापासून पूर्णपणे अलिप्त आहे. ना मोबाईल, ना इंटरनेट, ना गाड्या, ना वीज. केवळ जंगल, समुद्र, आणि त्यांचा आपापसातील संवाद. ही लोकं बाहेरच्या कुणालाही बेटावर येऊ देत नाहीत. कोणी आल्याचं दिसलं, की ते हत्यार घेऊन थेट हल्ला करतात.

भारतीय सरकारने १९५६ सालीच हे बेट संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलं. आजही, कोणालाही या बेटापासून ३ KM पेक्षा जवळ जाण्याची परवानगी नाही. कारण ही जमात इतकी एकाकी आणि वेगळी आहे, की त्यांना आपल्या आजूबाजूच्या जगाचं काहीही माहीत नाही आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे, त्यांचं शरीर आपल्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकत नाही.

आपल्यासाठी साधं वाटणारं सर्दी किंवा ताप, त्यांच्या शरीरासाठी प्राणघातक ठरू शकतो. आपण जर त्यांच्याजवळ गेलो आणि आपल्याकडून काही संसर्ग गेला, तर संपूर्ण जमात नष्ट होऊ शकते, अशी भीती आहे.

२९ मार्च रोजी नेमकं काय घडलं ?

२९ मार्च रोजी पहाटे, मायखाइलो विक्टोरोविच पोल्याकोव्हने दक्षिण सेंटिनेल बेटावरून एक लहान रबर बोट घेतली आणि उत्तर सेंटिनेल बेटाच्या किनाऱ्याजवळ पोहोचला. दुर्बिणीतून बेटाच्या किनाऱ्याकडे नजर ठेवत त्याला आदिवासी दिसण्याची अपेक्षा होती. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे, त्याने किनाऱ्यावर उतरून नारळ आणि डाएट कोकचा कॅन ठेवला. नंतर तो शिट्टी वाजवून आदिवासींचं लक्ष वेधण्याचा प्रयत्नही करू लागला.

याआधी त्याने अफगाणिस्तानात जाऊन तालिबान लढवय्यांबरोबर फोटो काढले, शस्त्र हातात घेतली, आणि हे सगळं त्याच्या युट्यूब चॅनलवर ‘थ्रिल’ म्हणून दाखवलं.

पण यावेळी तो भारताच्या दक्षिण टोकापलीकडे, अंदमान आणि निकोबार बेटसमूहात पोहोचला होता. जगातील सर्वात एकांतातील आणि अलिप्त आदिवासी बेट – नॉर्थ सेंटिनेल. हे त्याचं लक्ष्य होतं. काही स्थानिक मच्छीमारांनी त्याला पाहिलं. ही बाब लगेचच पोलीस प्रशासनाच्या कानावर गेली. आणि मग या नंतर त्याला ३ दिवसांत अटक झालेली होती.

पोलिसांनी कशी केली अटक?

बेटावरून परतल्यावर पोल्याकोव्ह दक्षिण सेंटिनेलवर आला, तेव्हा काही स्थानिक मच्छिमारांनी त्याला पाहिलं आणि लगेच पोलिसांना कळवलं. २७ मार्चला पोर्त ब्लेअरमध्ये दाखल झालेल्या या पर्यटकाला ३ दिवसांनी अटक करण्यात आली. तो तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे.

पोल्याकोव्ह कोण आहे?

पोल्याकोव्ह हा युट्यूबर असून त्याचे वडील युक्रेनचे आहेत. तो जगभरातील धोकादायक आणि दुर्गम भागांत प्रवास करताना व्हिडिओ बनवतो. याआधी त्याने अफगाणिस्तानात तालिबान लढवय्यांबरोबर फोटो काढले होते, आणि त्यांच्या शस्त्रांबरोबर व्हिडीओ शूट केला होता. त्याने अंदमान आणि निकोबार बेटसमूहाच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करूनच नॉर्थ सेंटिनेल बेटावर जाण्याचा घाट घातला होता.

कायद्याचा भंग

भारत सरकारने नॉर्थ सेंटिनेल बेटाला १९५६ पासून संरक्षित आदिवासी क्षेत्र घोषित केलं आहे. तिथे ३ किमी आत प्रवेश करण्यास बंदी आहे. या बेटावर सुमारे १०० ते ३०० आदिवासी राहतात, जे बाहेरील जगाशी संपर्क टाळतात. या जमातींना आधुनिक रोगप्रतिकारक शक्ती नसल्यामुळे कोणताही बाह्य संपर्क त्यांच्यासाठी घातक ठरू शकतो.

कायदेशीर कारवाई

पोल्याकोव्हवर भारताच्या संरक्षित क्षेत्रात बेकायदेशीर प्रवेश करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषी आढळल्यास त्याला ८ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. अंदमानचे पोलीस महासंचालक एच.जी.एस. ढलिवाल यांनी सांगितले की, "हा अमेरिकन नागरिक आदिवासी क्षेत्राजवळ आढळल्यावर त्याला अटक केली.

या पूर्वी केलेले प्रयत्न

John Allen Chau

1. जॉन एलेन चाऊ (John Allen Chau) – 2018

  • अमेरिकन ख्रिश्चन धर्मप्रसारक (Missionary)

  • नोव्हेंबर 2018 मध्ये, जॉन चाऊने बेकायदेशीरपणे नॉर्थ सेंटिनेल बेटावर जाण्याचा प्रयत्न केला. त्याचा उद्देश होता या जमातीला ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे.

  • बायबल, भेटवस्तू, मासे इ.

  • बेटावर पोहोचताच जमातीने त्याच्यावर बाणांनी हल्ला करून त्याचा खून केला. त्याचे शवदेखील परत मिळवता आले नाही.

  • या घटनेनंतर भारत सरकारने परत एकदा कडक इशारा दिला की या बेटावर जाणे गंभीर गुन्हा आहे.

2. २००६ – दोन स्थानिक मच्छीमार

  • घटना: दोन स्थानिक मच्छीमारांनी (Sunder Raj आणि Pandit Tiwari) मासेमारी करत असताना चुकून नॉर्थ सेंटिनेल बेटाजवळ त्यांची बोट गेली.

  • जमातीने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा मृत्यू केला.

  • भारतीय कोस्ट गार्डने हेलिकॉप्टरद्वारे त्यांची बॉडी परत आणायचा प्रयत्न केला, पण जमातीने बाणांनी हेलिकॉप्टरवरही हल्ला केला.

3. १९७० ते १९९० – संशोधक आणि सरकारचे प्रयत्न

  • भारत सरकार आणि काही मानववंशशास्त्रज्ञ (Anthropologists) यांनी १९७० ते १९९० च्या दरम्यान या जमातीशी संपर्क साधायचा प्रयत्न केला.

  • तेव्हा जमातीला फळं, नारळ अशा वस्तू देऊन संपर्काचा प्रयत्न होत असे.

  • काही वेळा प्रतिसाद मिळाला, तर काही वेळा शत्रुत्वाने हल्ला केला गेला.

  • शेवटी १९९७ नंतर हे प्रयत्न पूर्णपणे थांबवण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT