Bhargavastra  x
राष्ट्रीय

Bhargavastra Testing: पाकिस्तानातून आता किती पण ड्रोन येऊ देत; भारताचे 'भार्गवास्त्र' आहे सज्ज!

Bhargavastra Testing: स्वदेशी बनावटीचे अस्त्र करणार शत्रुंच्या ड्रोनचा गेम ओव्हर; भारताच्या संरक्षण यंत्रणेला मिळाले नवे बळ

पुढारी वृत्तसेवा

India Successfully tests Bhargavastra anti drone system

नवी दिल्ली : तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे डोन हवेतून तरंगत शत्रूच्या प्रदेशात सोडून संहार घडवून आणता येतो. त्यामुळेच युद्धाच्या आधुनिक तंत्रात अलीकडच्या काळात ड्रोनचा वापर अनिवार्य बनला आहे.

युद्धात किंवा शत्रुंना त्रास देण्यासाठी ड्रोनचा वापर वाढल्यानंतर त्यावरही उपाययोजना शोधल्या जाऊ लागल्या.

त्यातून ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित झाल्या आहेत. आता भारताने स्वतःची अशी स्वदेशी ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित केली आहे. भार्गवास्त्र असे यंत्रणेचे नाव असून या अस्त्राद्वारे शत्रुंची ड्रोन्स हवेतच नष्ट करता येतात. नुकतेच या भार्गवास्त्राची पहिली चाचणी यशस्वी झाली.

ड्रोनच्या झुंडी नष्ट करण्यासाठी प्रभावी हत्यार

या भार्गवास्त्रमुळे स्वदेशी संरक्षण क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे. Solar Defence and Aerospace Limited (SDAL) ने विकसित केलेली 'भार्गवास्त्र' ही नवीन, कमी खर्चिक आणि अत्याधुनिक ड्रोनविरोधी प्रणाली आहे. ही प्रणाली विशेषतः ड्रोन झुंडी (Swarm Drones) विरुद्ध प्रभावी लढा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

गोपाळपूर येथे यशस्वी चाचणी

13 मे रोजी गोपाळपूर येथील ‘Seaward Firing Range’ वर तीन चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांना आर्मी एअर डिफेन्स (AAD) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

तीन पैकी दोन चाचण्या प्रत्येकी एक मायक्रो रॉकेटने करण्यात आल्या तर एक चाचणी दोन रॉकेट्स सल्व्हो मोडमध्ये (दोन सेकंदात) करण्यात आली.

सर्व रॉकेट्सने अपेक्षित निकष पूर्ण केले असून, ही प्रणाली भविष्यातील ड्रोन हल्ल्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

'भार्गवास्त्र' ची वैशिष्ट्ये:

  • पहिल्या थरात: Unguided Micro Rockets, जे 20 मीटर व्यासातील ड्रोन झुंडी नष्ट करू शकतात.

  • दुसऱ्या थरात: Guided Micro Missiles, जे टप्प्याटप्प्याने अचूक लक्ष्यभेदी क्षमतेने कार्य करतात.

  • ओळख क्षमतेसाठी: EO/IR (Electro-Optical/Infrared), Radar आणि RF Sensor आधारित आधुनिक मल्टी-सेन्सर मॉड्युलर प्रणाली

  • शत्रू ड्रोनचा 2.5 किलोमीटरपर्यंत शोध व नष्ट करण्याची क्षमता

  • 6 ते 10 किमी अंतरावरून हवाई धोक्यांचा अचूक शोध

  • 5000 मीटर उंचीवर देखील सहज वापरयोग्य – पर्वतीय प्रदेशांसाठी योग्य

सॉफ्ट किल मोडसह संपूर्ण संरक्षण

ही प्रणाली केवळ हार्ड किल (नष्ट करणारी) नव्हे तर जॅमिंग व स्पूफिंग सारख्या सॉफ्ट किल पर्यायांनी देखील सुसज्ज केली जाऊ शकते.

मॉड्युलर डिझाइन असल्यामुळे, विविध सेन्सर्स व फायरिंग यंत्रणा युजरच्या गरजेनुसार कॉन्फिगर करता येतात. ही प्रणाली भारताच्या नेटवर्क-सेंट्रिक वॉरफेअर यंत्रणेत सहज समाविष्ट करता येईल.

'Make in India' साठी अभिमानाची बाब

‘भार्गवास्त्र’ ही प्रणाली पूर्णतः स्वदेशी विकसित असून, 'Make in India' अभियानाला बळ देणारी व भारताच्या हवाई संरक्षण कवचात महत्त्वाची भर टाकणारी आहे.

अशा प्रकारची मल्टि-लेयर्ड आणि स्वस्त ड्रोन विरोधी प्रणाली जागतिक स्तरावर अजून कुठेही पूर्णतः तैनात झालेली नाही, असे SDAL च्या सूत्रांनी नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT