पुढारी ऑनलाईन डेस्क
कोट्यवधी कमाई करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत (Indians earning) वाढ झाल्याचा सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चचा (Centrum Institutional Research) एक अहवाल समोर आला आहे. त्यात गेल्या पाच वर्षांत वार्षिक १० कोटींहून अधिक कमाई असणाऱ्या भारतीयांच्या संख्येत ६३ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. तसेच वार्षिक ५ कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्या भारतीयांची संख्या ४९ टक्क्यांनी वाढून ५८,२०० गेल्याचे अहवालात नमूद केले आहे.
ज्यांची वार्षिक कमाई १० कोटींहून अधिक आहे; अशा भारतीयांची संख्या आता सुमारे ३१,८०० एवढी झाली आहे. ही संख्या गेल्या पाच वर्षांत ६३ टक्क्यांनी वाढली आहे. याच कालावधीत वार्षिक ५० लाख रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्या लोकांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली आहे. ५० लाखांहून अधिक कमाई असणारे जवळपास १० लाख लोक आहेत.
"श्रीमंत भारतीयांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ होत आहे. आर्थिक वर्ष २०१९ आणि २०२४ दरम्यान सुमारे ५ कोटी कमाई असणाऱ्यांची संख्या ४९ टक्क्यांनी वाढून ५८,२०० झाली आहे. तर सुमारे १० कोटी कमाई असलेल्या लोकांची संख्या ६३ टक्क्यांनी वाढून सुमारे ३१,८०० झाली आहे." असे अहवाल नमूद केले आहे. श्रीमंत व्यक्तींची संख्या वाढत असतानाच त्यांच्या एकत्रित उत्पन्नातही वेगाने वाढ झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.
सुमारे ५० लाख रुपये कमाई असणाऱ्या व्यक्तींची संख्या २५ टक्क्यांनी वाढून सुमारे १० लाख झाली असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. उच्च कमाई असणाऱ्यांची संख्या आणि त्यांच्या उत्पन्नातील वाढीव्यतिरिक्त अहवालात असे नमूद केले आहे की भारतातील केवळ १५ टक्के आर्थिक संपत्तीचे व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापन केले जाते, तर प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये हे प्रमाण ७५ टक्के आहे.