Smelly Shoes Ig Nobel Prize 2025 :
जगात असं घर नसेल जिथं एक तरी दुर्गंधीयुक्त शूज नसेल... काहीही करता या समस्येपासून कोणाचीही सुटका झालेली नाही. हा सर्वात वाईट अनुभव असतो. मात्र याच दुर्गंधीयुक्त शूजच्या समस्येमुळं भारताच्या दोन संशोधकांना Ig Nobel Prize 2025 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचं मानांकन मिळवून दिलं आहे. त्यांनी आपल्या शू रॅकमधील एका दुर्गंधीयुक्त शूजमुळं इतर शूजवर कहा परिणाम होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या संशोधनासाठीच त्यांना Ig Nobel Prize 2025 चं मानंकन मिळालं. हा पुरस्कार हा एक गंमतीशीर मात्र वैज्ञानिक संशोधनासाठी दिला जातो.
भारतीय संशोधक विकास कुमार आणि सारथक मित्तल यांनी शूजची दुर्गंधी आणि तो वापरण्याचा परिणाम यावर शास्त्रीय अभ्यास केला. ४२ वर्षाचे विकास कुमार हे दिल्लीजवळील शिव नादर विद्यापीठात डिझाईन शिकवतात. २९ वर्षाचा सार्थक मित्तल हा त्यांचा माजी विद्यार्थी आहे. या दोघांनी मिळून दुर्गंधीयुक्त शूजवर संशोधन केलं.
हॉस्टेलच्या परिसरात केलेल्या निरीक्षणातून त्यांना जाणवले की, विद्यार्थी शूज बाहेर ठेवतात कारण त्यांना जागा कमी नाही, तर शूजला येणारी बदबू ही त्याची खरी समस्या आहे. याच समस्येवर संशोधन करण्यासाठी त्यांनी हॉस्टेलमधील १४९ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले, ज्यात निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी बुटांच्या वासामुळे कधीतरी लाज वाटल्याचे मान्य केले.
या समस्येवर बेकिंग सोडा किंवा डिओ स्प्रे यांसारखे घरगुती उपाय दीर्घकाळ चालत नाहीत हे लक्षात आल्यावर, त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला. जूत्यांच्या दुर्गंधीला कारणीभूत असणारा 'काइटोकॉकस सेडेंटेरियस' नावाचा जीवाणू (Bacteria) ओळखून, त्यावर अल्ट्राव्हायोलेट (UV) प्रकाशाचा प्रयोग केला.
त्यांनी निष्कर्ष काढला की, जर शू-रॅकला यूवी-सी लाईट लावली, तर ती जूत्यांना केवळ ठेवणार नाही, तर त्यांना 'स्टरिलायझ' देखील करेल. ॲथलीट्सच्या शूजवर केलेल्या प्रयोगात त्यांना आढळले की, जीवाणू मुख्यतः बोटांच्या भागात जमा होतात आणि केवळ २-३ मिनिटांचा यूवी-सी उपचार दुर्गंधी आणि जीवाणू मारण्यासाठी पुरेसा आहे.
मात्र, जास्त काळ प्रकाश दिल्यास रबर वितळू शकते, हेही त्यांना आढळले. सहा मिनिटांपर्यंत यूवी-सीचा प्रयोग केल्यास शूज पूर्णपणे गंधमुक्त आणि थंड राहतात, पण १०-१५ मिनिटांनंतर पुन्हा जळक्या रबराचा वास येतो आणि शूज गरम होतात, हे त्यांनी सिद्ध केले. अशाप्रकारे, त्यांनी बदबूदार शूजच्या समस्येवर पारंपरिक रॅकला यूवी-सी लाईटने सुसज्ज करून एक नवीन आणि उपयुक्त 'शू-रॅक' डिझाइन करण्याची संकल्पना मांडली आहे.