प्रातिनिधिक छायाचित्र.  File Photo
राष्ट्रीय

India-Pakistan War : पेट्रोल-डिझेलबाबत 'पॅनिक' होवू नका! देशभरात भरपूर इंधन साठा : इंडियन ऑइलची स्‍पष्‍टोक्‍ती

सर्वत्र पुरवठा सुरळीतपणे सुरु, अतिरिक्‍त इंधन खरेदीची गरज नसल्‍याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

India-Pakistan War :

देशभरात भरपूर इंधन साठा आहे. आमच्‍याकडून सर्वत्र सुरळीत पुरवठाही सुरु आहे. त्‍यामुळे ग्राहकांनी घाबरुन जावून अतिरिक्‍त इंधन खरेदी करण्‍याची गरज नाही. आमच्‍या सर्व आउटलेटवर इंधन आणि एलपीजी उपलब्ध आहे, अशी माहिती इंडियन ऑइल कॉर्प लिमिटेडने आज ( दि. ९ मे) सकाळी अधिकृत एक्स हँडलवर पाेस्‍ट करत दिली.

भारताने पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍याचा बदला घेण्‍यासाठी ६ मेच्‍या मध्‍यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवले. गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशीही भारताने पाकिस्‍तानविरोधात धडक मोहिम राबवली. यानंतर आता जीवनावश्‍यक वस्‍तूंच्‍या पुरवठ्याविषयी नागरिकांमध्‍ये एका प्रकारची धास्‍ती निर्माण झाली आहे. इंधन मिळणार नाही, या भीतीने अनेक ठिकाणी अतिरिक्‍त इंधन खरेदीही केली जात आहे. यावर आता इंडियन ऑइल कॉर्प लिमिटेड एक्‍सवर पोस्‍ट करत देशात पुरेसा इंधन साठा असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

इंडियन ऑइल कॉर्प लिमिटेड एक्‍सवर पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे की, "देशभरात भरपूर इंधन साठा आहे. आमच्‍याकडून सर्वत्र सुरळीत पुरवठाही सुरु आहे. त्‍यामुळे ग्राहकांनी घाबरुन जावून अतिरिक्‍त इंधन खरेदी करण्‍याची गरज नाही. आमच्‍या सर्व आउटलेटवर इंधन आणि एलपीजी उपलब्ध आहे.

ग्राहकांना केले सहकार्याचे आवाहन

भारत-पाकिस्तान तणावामुळे सामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी सायंकाळपासून ८ मे पासून, दोन्ही शेजारी देशांमधील वेगवेगळ्या ठिकाणी अनेक तणावपूर्ण घटना घडल्या आहेत. यानंतर अनेक ठिकाणी नागरिक जीवनावश्‍यक वस्तूंचा साठा ठेवण्याचा प्रयत्न करत असल्‍याचे चित्र आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड ही देशातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक आहे. तेल, वायू, पेट्रोकेमिकल्स आणि पर्यायी उर्जास्रोतांच्या क्षेत्रात कार्य करते. आज एक्‍सवर पोस्‍ट करत कंपनीने देशात पुरेसा इंधनसाठा असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. पुरवठा साखळीवर होणार दुष्‍परिणाम टाळण्‍यासाठी देशवासियांना एकजूट आणि समजूतदारपणाची विनंती करत ग्राहकांना सहकार्याचेही आवाहन कंपनीच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT