राष्ट्रीय

Nanochip Revolution : तळहाताएवढा 'वेफर' दाखवत मंत्री वैष्णव यांनी मांडली भारताची 'डिजिटल' गाथा, जाणून घ्‍या नेमकं काय म्‍हणाले?

आधुनिक जगात डेटा हेच पेट्रोल, डेटा सेंटर्स नवीन रिफायनरी केंद्रे

पुढारी वृत्तसेवा

Nanochip Revolution : डिजिटल क्रेडिट), वेगवान मोबाइल डेटा आणि 'लार्ज लँग्वेज मॉडेल्स' (LLMs) अशा काही उपक्रमांमुळे भारताने डिजिटल-आधारित विकासाची गाथा सुरू केली आहे. पूर्वी ७ नॅनोमीटर, ५ नॅनोमीटर चिप्स बनत असत. आज आपण आपल्या देशात २ नॅनोमीटर चिप्सचे डिझाइन करत आहोत. त्या सर्वात जटिल आणि आकाराने लहान आहेत. त्यांचे डिझाइन आता भारतात होत आहे," अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज (दि. १८) दिली. यावेळी त्‍यांनी तळहाताच्या आकाराचा सेमीकंडक्टर वेफरचा नमुना दाखवत भविष्‍यातील डिजिटल क्रांती कशी घडेल, याचीही माहिती दिली.

आधुनिक जगात डेटा हेच पेट्रोल

नवी दिल्ली येथे झालेल्या 'एनडीटीव्‍ही' वर्ल्ड समिटमध्ये बोलताना त्‍यांनी तळहाताच्या आकाराचा सेमीकंडक्टर वेफरचा (वेफरवर अनेक चिप्स (ICs) एकाच वेळी तयार केल्या जातात) नमुना दाखवत अश्विनी वैष्णव म्‍हणाले की, यामध्‍ये जागतिक बाजारपेठेतील या उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांना टक्कर देण्याची क्षमता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डेटाचे सार्वभौमत्व भौगोलिकदृष्ट्या भारतामध्येच राहिले पाहिजे, यावर आमचा भर आहे. आधुनिक जगता डेटा हे नवीन पेट्रोल आहे. डेटा सेंटर्स या नवीन तेल शुद्धीकरण (रिफायनरी) केंद्रे आहेत. आजच्या अर्थव्यवस्थेत जी नवी अर्थव्यवस्था आकार घेत आहे. आपण आपल्या भविष्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि आपल्या देशातील प्रतिभेला इथेच संधी मिळतील याची खात्री केली पाहिजे," अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

२ नॅनोमीटर चिप्सचे डिझाइन भारतात

जगातील अगदी मोजक्या देशांकडे असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून भारत चिप्स बनवत आहे. जागतिक डिझाइन इंजिनिअर्सपैकी २० टक्के प्रतिभा भारतात आहे. आज आपण आपल्या देशात २ नॅनोमीटर चिप्सचे डिझाइन करत आहोत. पूर्वी ७ नॅनोमीटर, ५ नॅनोमीटर चिप्स बनत असत. आता २ नॅनोमीटर चिप्स इथे आहेत; त्या सर्वात जटिल आणि लहान चिप्स आहेत. त्यांचे डिझाइन आता भारतात होत आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

'एक चिप मानवी केसांपेक्षा १० हजार पटीने लहान'

" चिप्‍स निर्मिती हा उद्योग खूप जटिल आहे. त्याची जटिलता खरोखरच खूप अवघड आहे. त्यामुळे एक चिप खूपच लहान असू शकते, तुम्ही ती साध्या सूक्ष्मदर्शकाखाली (मायक्रोस्कोप) देखील पाहू शकत नाही. ती मानवी केसांपेक्षा १० हजार पटीने लहान असते," असे वैष्णव यांनी नमूद केले.

चिप बनवण्याचे काम म्हणजे एका लहान वेफरवर संपूर्ण शहर वसवण्यासारखे....

चिप बनवण्याचे काम म्हणजे एका लहान वेफरवर ( Wafer) संपूर्ण शहर वसवण्यासारखे आहे, असे सांगत ते म्हणाले. देशात बनलेली चिप हातात घेऊन केंद्रीय मंत्री म्हणाले, "यावर एक संपूर्ण शहर वसवण्‍यासारखे आहे. यामध्‍ये स्वतःचे प्लम्बिंग, स्वतःचे हीटिंग, स्वतःचे इलेक्ट्रिकल नेटवर्क, स्वतःचे सर्किट्स असतील ही एक खूप, खूप गुंतागुंतीची गोष्ट आहे. चिप बनवण्यासाठी वापरले जाणारे रसायने आणि वायू अत्यंत शुद्ध, अति-शुद्ध (अल्ट्रा-प्युअर) असतात. यामध्‍ये ५००-अधिक रासायनिक भाग प्रति अब्ज (पार्ट्स पर बिलियन) शुद्धता लागते," असेही वैष्णव यांनी स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT