India Issues Notice To US pudhari
राष्ट्रीय

India Issues Notice To US: धाडस दाखवलं! भारतानं पहिल्यांदाच अमेरिकेच्या राजदूतांना पाठवली नोटीस... ३ भारतीय आहेत मिसिंग

Anirudha Sankpal

India Issues Notice To US Over 3 Indian Missing: ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच भारतानं अमेरिकेच्या राजदूत कार्यालयातील अधिकाऱ्याला नोटीस पाठवली आहे. भारताने ही नोटीस बुधवारी पाठवली असून दिल्लीतील अमेरिकेच्या उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना ही नोटीस पाठवली आहे. अमेरिकेच्या लष्करांनी ओमानजवळील व्यावसायिक जहाजावर हल्ला केला होता. या जहाजावर २४ भारतीय प्रवासी होते. त्यातील २१ जणांना वाचवण्यात यश मिळालं होतं. तर तीन प्रवाशी अजूनही बेपत्ता आहेत.

सर्गिओ गोर नाहीत भारतात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे अधिकारी जेसन मीक्स यांना या घटनेनंतर नोटीस पाठवली आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्गिओ गोर हे भारतात नसल्यामुळं जेसन यांना नोटीस पाठवली आहे. गोर हे सध्या कझाकिस्तान दौऱ्यावर आहेत.

भारतानं केला जाहीर निषेध

याबाबत सविस्त माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, 'आम्ही सेट्टेबेल्लो या व्यावसायिक जहाजावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करतो. या जहाजावर २४ भारतीय कर्मचारी कार्यरत होते. त्यातील २१ भारतीयांना वाचवण्यात यश मिळालं आहे. मात्र ३ भारतीय अजूनही मिसिंग आहेत. ओमानमधील आमचं उच्चायुक्तालय या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. ओमानच्या प्रशासनासोबत शोध मोहीम आणि बचाव कार्य सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन व्हावे

भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, 'या भागात होत असलेल्या व्यावसायिक जहाजांवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यामुळं आम्ही खूप चिंतेत आहोत. आम्ही या भागातील तणाव त्वरित कमी करण्यात यावा अशी मागणी पुन्हा करत आहोत. सध्या सुरू असलेल्या वाटाघाटी निर्णयाप्रत याव्यात जेणेकरून या भागातील शांतता आणि स्थैर्य पुनर्स्थापित होईल.'

परराष्ट्र मंत्रालय पुढे म्हणते, 'व्यावसायिक जहाजांना, सामान्य नागिरक, इन्फ्रास्ट्रक्चर यांना टार्गेट करणं थांबलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय हद्दीतून मुक्त आणि कोणत्याही अडथळ्याविना व्यापार व्हावा. आंतरराष्ट्रीय हद्दीत आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन व्हावे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT