नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की आणि अझरबैजानकडून पाकिस्तानला मिळालेल्या समर्थनामुळे भारतातील नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर#BoycottTurkeyAzerbaijan हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे, ज्यात हजारो भारतीयांनी या देशांमध्ये प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे.
2024 मध्ये 3.3 लाख भारतीयांनी तुर्की, तर 2.43 लाखांनी अझरबैजानला भेट दिली होती; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. सोशल मीडियावर अनेक वापरकर्त्यांनी म्हटले आहे की, पर्यटन हा एक पर्याय आहे आणि त्या पर्यायातून आपण अशा देशांना निवडू नये, जे आपल्या विरोधकांच्या पाठीशी उभे आहेत.
लोक आता तुर्की व अझरबैजानच्या ट्रिप्स रद्द करत आहेत. हे देश पूर्वी पर्यटकांमध्ये लोकप्रिय होते; पण आता जी भूमिका त्यांनी घेतली आहे, त्यामुळे भारतीय पर्यटकांचा कल बदलत आहे. गुरुवारी संध्याकाळी ‘द’वर (पूर्वीचं ट्विटर) हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला.