Income Equality Pudhari
राष्ट्रीय

Income Equality in India | जगात उत्पन्न समानतेत भारत टॉप 4 मध्ये! चीन-अमेरिकेलाही मागे टाकलं; जागतिक बँकेचा अहवाल

Income Equality in India | जिनी निर्देशांकात भारताची मोठी सुधारणा; 17 कोटी लोक अति दरिद्रतेमधून बाहेर

पुढारी वृत्तसेवा

Income Equality in India ranks 4th in income equality World Bank report Gini Index World Bank 2025 Global inequality rankings 2025

नवी दिल्ली : जागतिक बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार भारत उत्पन्न समानतेच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 2022 मध्ये भारताचा जिनी निर्देशांक (Gini Index) 25.5 इतका नोंदवण्यात आला असून, ही कामगिरी चीन (35.7), अमेरिका (41.8) आणि बहुतेक G7 व G20 देशांपेक्षा अधिक चांगली आहे.

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले की, “भारत आता ‘मध्यम-निम्न’ विषमता असलेल्या देशांच्या यादीत येतो, ज्यामध्ये जिनी निर्देशांक 25 ते 30 दरम्यान असतो. सध्या भारत हा ‘निम्न विषमता’ गटात सामील होण्यापासून फक्त काही अंश दूर आहे.”

भारताची चांगली कामगिरी कोणत्या देशांपेक्षा?

  1. स्लोव्हाक प्रजासत्ताक – 24.1

  2. स्लोव्हेनिया – 24.3

  3. बेलारूस – 24.4

या तीन देशांनंतर भारताचा क्रमांक लागतो. भारताचा जिनी निर्देशांक 25.5 आहे. जगातील 167 देशांमध्ये भारताची कामगिरी चतुर्थ स्थानावर असल्याचे सांगण्यात आले आहे.

गरीबी कमी करण्यातील यश

गेल्या दशकात भारताने 171 दशलक्ष (17.1 कोटी) नागरिकांना अति दारिद्य्रातून बाहेर काढले आहे. 2011-12 मध्ये दररोज 2.15 डॉलर्सपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांची टक्केवारी 16.2 टक्के होती, जी 2022-23 मध्ये 2.3 टक्के वर आली आहे.

नवीन निकषांनुसार, जेथे अति दरिद्रतेची व्याख्या 3 डॉलर्स प्रतिदिन अशी केली आहे, तेव्हा भारतातील अतिदरिद्री लोकसंख्या 5.3 टक्के इतकी राहते.

जिनी निर्देशांक म्हणजे काय?

जिनी निर्देशांक हा उत्पन्न, संपत्ती किंवा उपभोगाचे समान वितरण किती आहे हे दर्शवणारा मापक आहे.

  • 0 - शून्य म्हणजे परिपूर्ण समानता

  • 100 - शंभर म्हणजे परिपूर्ण विषमता (संपूर्ण संपत्ती एकट्या व्यक्तीकडे)

सरकारचे स्पष्टीकरण

सरकारने म्हटले आहे की, “भारताने केवळ आर्थिक वाढीवर लक्ष केंद्रीत न करता सामाजिक न्याय व समतेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच आज भारत उत्पन्न समानतेच्या आघाडीच्या देशांमध्ये समाविष्ट झाला आहे.”

भारतासारख्या प्रगतीशील देशाची तुलना आईसलँड, नॉर्वे, फिनलंड, बेल्जियम यांसारख्या प्रगत कल्याणकारी व्यवस्थेच्या युरोपीय देशांशी होत आहे. संयुक्त अरब अमिराती आणि पोलंड यांसारखी काही समृद्ध राष्ट्रेही 'मध्यम-निम्न विषमता' गटात येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT