राफेल मरीन लढाऊ विमाने. (Source- Dassault Aviation)
राष्ट्रीय

Rafale M fighter Deal | पाकिस्तानची आता खैर नाही! भारत-फ्रान्समध्ये २६ राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीवर शिक्कामोर्तब

जाणून घ्या, कशी आहे त्याची क्षमता?

दीपक दि. भांदिगरे

Rafale M fighter Deal

नवी दिल्ली : भारत आणि फ्रान्सदरम्यान सोमवारी भारतीय नौदलासाठी सुमारे ६४ हजार कोटी रुपये किमतीच्या २६ राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदी करारावर शिक्कामोर्तब झाले. या कराराच्या स्वाक्षरी कार्यक्रमावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

या करारावेळी भारताकडून संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी प्रतिनिधित्व केले. नौदलाचे व्हाइस चीफ व्हाइस अ‍ॅडमिरल के. स्वामीनाथन यांचीही उपस्थिती होती.

या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने भारतीय नौदलासाठी २६ अत्याधुनिक राफेल-मरिन लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली होती.

या स्पर्धात्मक प्रक्रियेत अमेरिकन बोईंग एफ/ए १८ सुपर हॉर्नेटचाही समावेश होता. पण भारतीय नौदलाने राफेल लढाऊ विमानांची निवड केली. राफेल हे भारतीय आवश्यकतेनुसार अधिक योग्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे राफेलची निवड करण्यात आली आहे.

Rafale Marine fighter jets | अत्याधुनिक शस्त्र प्रणालींनी सुसज्ज

ही राफेल विमाने अत्याधुनिक शस्त्र प्रणालींनी सुसज्ज असतील. यात लांब पल्ल्याची हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध यांचा समावेश असेल. या करारानुसार भारतात विमाने निर्मिती करणे अनिवार्य नसले तरी, राफेलमध्ये सहभागी असलेल्या डसॉल्ट, थेल्स आणि एमबीडीए सारख्या फ्रेंच कंपन्या त्यांच्या भारतीय भागीदारांना स्थानिक पातळीवर उपकरणे आणि उपप्रणाली निर्मितीसाठी ऑर्डर देण्याची शक्यता आहे.

युद्धनौकांवर हल्ला करण्यात तरबेज

या करारातर्गंत २२ सिंगल सीट राफेल-एम आणि ४ डबल ट्रेनर सीट राफेल-एम विमाने भारताकडून खरेदी करण्यात येणार आहेत. हिंदी महासागरातच ही विमाने तैनात केली जाणार आहेत. युद्धनौका तसेच अणुप्रकल्पांवर हल्ला करण्यात ही विमाने तरबेज मानली जातात. आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर या विमानांचा तळ असेल. याआधीही भारताने सप्टेंबर २०१९ मध्ये फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली होती. त्यासाठी ५९ हजार कोटी रुपये मोजले होते.

कशी आहे राफेल-एम विमानांची क्षमता

विमानांची लांबी १५.२७ मीटर

रुंदी १०.८० मीटर

वजन १० हजार ६०० किलो

विमानांचा वेग ताशी १९१२ किलोमीटर

५० हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करण्याची क्षमता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT