भारतीय हवामान विभागाने गुरुवारी मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला.  Pudhari Photo
राष्ट्रीय

IMD Monsoon Forecast | ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?

हवामान विभागाकडून मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जाहीर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी मान्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील (second half of the monsoon season) पावसाचा अंदाज जाहीर केला. मान्सूनच्या उत्तरार्धात भारताच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. दक्षिणेचा मध्य भाग आणि लगतचा उत्तर द्वीपकल्पीय भारत, ईशान्य, लगतच्या पूर्व भारताचा भाग तसेच वायव्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (IMD Monsoon Forecast)

हवामान विभागाचे (IMD) म्हणणे आहे. मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात १०६ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण भारतात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

'या' भागांत मान्सूनचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी

पण मान्सूनच्या उत्तरार्धात ईशान्य, पूर्व भारतातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, जुलैमध्ये भारतात सरासरीपेक्षा ९ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. "पंजाब, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमध्ये जुलैमध्ये कमी पावसाची नोंद झाली आहे. जुलैमध्ये वायव्य भागात सरासरीपेक्षा १४.३ टक्के कमी पाऊस पडला," असे IMD ने म्हटले आहे. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, गंगेच्या खोऱ्यातील बंगाल आणि ओडिशासह पूर्व भारतात जुलैमध्ये कमी पाऊस झाल्याचे हवामान विभागाने पुढे नमूद केले आहे.

ऑगस्टमध्ये कसा राहील पाऊस?

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण भारतात चांगला पाऊस होईल. दरम्यान, या कालावधीत मध्य भारतात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. दरम्यान, पुढील ५ दिवस मध्य प्रदेश, महाराष्ट्रात अतिवृष्टीचा रेड अलर्ट राहील. ८ ऑगस्टनंतर पुढील काही दिवस संपूर्ण भारतात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हवामान विभागाने मे महिन्यात जाहीर केलेल्या अंदाजात, संपूर्ण देशात या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर २०२४) सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला होता. यंदा दीर्घ कालावधी सरासरीच्या (LPA) तुलनेत १०६ टक्के पाऊस राहील, असे सांगण्यात आले होते.

मध्य महाराष्ट्र, कोकणमध्ये अतिवृष्टीचा इशारा

१ ते ३ ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच ३ ऑगस्ट रोजी कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT