IBPS Clerk Recruitment 2024
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनकडून राष्ट्रीय बँकांतील क्लार्कच्या ६,१२८ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. file photo
राष्ट्रीय

IBPS Clerk Recruitment 2024 | बँकांमध्ये ६,१२८ पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन ( IBPS) कडून राष्ट्रीय बँकांतील क्लार्कच्या ६,१२८ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. (IBPS Clerk Recruitment 2024) या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै असून त्यासाठी इच्छुक उमेदवार ibps.in यावर ऑनलाईन अर्ज करु शकतात. IBPS क्लार्कच्या प्राथमिक परीक्षा २०२४ ऑगस्टमध्ये घेतल्या जातील, तर मुख्य परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहे.

परीक्षेचा तारखा

या भरतीसाठी पूर्व परीक्षा प्रशिक्षण १२ ते १७ ऑगस्ट दरम्यान होईल. प्रीलिम्स परीक्षा २४, २५ आणि ३१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. तर निकाल सप्टेंबरमध्ये जाहीर होणार आहे. उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा १३ ऑक्टोबर रोजी होईल. या भरती प्रक्रियेत मुलाखत नाही.

'या' बँकांमध्ये भरती

  • पंजाब नॅशनल बँक

  • बँक ऑफ बडोदा

  • इंडियन बँक

  • कॅनरा बँक

  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया

  • इंडियन ओव्हरसीज बँक

  • पंजाब अॅंड सिंध बँक

  • यूनियन बँक ऑफ इंडिया

  • बँक ऑफ महाराष्ट्र

पात्रता काय?

कोणत्या मान्यतापात्र विद्यापीठातून अथवा कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयातून पदवी घेतलेली असणे आवश्यक.

वयोमर्यादा

विहित कट-ऑफ तारखेला उमेदवारांचे वय २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील (SC, ST, OBC आदी) उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

पगार काय?

१९,९००- ४७,९२० रुपये

कोणती कागदपत्रे हवीत?

  • पदवी गुणपत्रक

  • आधार कार्ड

  • जातप्रमाणपत्र

  • निवासी दाखला

  • मोबाईल नंबर, ईमेल आयडी

  • पासवर्ड साइज फोटो आणि त्यावर स्वाक्षरी

असा करा अर्ज?

  • इच्छुक उमेदवारांनी ibps.in या कार्यालयीन वेबसाइटवर भेट द्यावी.

  • Recruitment of Clerk 2024 या पर्यायावर क्लिक करा.

  • Apply Online वर क्लिक करा.

  • मागितलेला तपशील प्रविष्ट करा.

  • भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

  • शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.

  • फॉर्मची प्रिंट काढून ठेवा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या https://ibpsonline.ibps.in/crpcl14jun24/ लिंकवर क्लिक करा. तर अधिकृत वेबसाइट जाण्यावर https://ibps.in/ यावर लिंक करा.

SCROLL FOR NEXT